मुंबईकडून आयपीएल २०१७ मध्ये १० सामने खेळलेल्या जोस बटलरने मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन चक्क न्यूड त्याच्या रूममध्ये केले. हा विडिओ त्याने स्वतःच त्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट शेअर केलाय.
स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक असलेला बटलर सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो मुंबई संघाबरोबर नव्हता.
या मोसमात त्याने मुंबईकडून १० सामने खेळताना १० सामन्यांत २७२ धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/BUXURZrg7ig/?taken-by=josbuttler
अतिशय रोमहर्षक झालेल्या मुंबई विरुद्ध पुणे हा सामना जगातील असंख्य प्रेक्षक टीव्हीवर पाहत होते. तसेच तो बटलरही पाहत होता. तो टॉवेल अंगाला गुंडाळून सामन्याचा आनंद घेत होता. शेवटच्या षटकात १ चेंडूत ४ धावा हव्या असताना जॉनसनने जबदस्त मारा करत मुंबईला विजय मिळवून देताच बटलरने उत्साहाच्या भरात विवस्र होऊन त्याने मुंबईच्या विजयाचा आनंद साजरा केला.