रविवारी (१४ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेट्स राखून पराभूत केले. या विजयासोबत ऑस्ट्रेलियामने टी२० विश्वचषकातील त्यांचे पहिले जेतेपद पटकावले आहे. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १७३ धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, पण ऑस्ट्रेलियान फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि २ विकेट्स गमावून १८.५ षटकात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेडलवूहने या सामन्यात स्वतःच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
जोश हेजलवूडे अंतिम सामन्यात विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आणि महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या आहेत. या विजयासोबत तो टी२०, एकदिवसीय आणि १९ वर्षाखालील विश्वचषकात खेळणारा आणि विजय मिळवणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम करणारा एकमात्र खेळाडू आहे, भारताचा दिग्गज अष्टपैलू यूवराज सिंग. आता हा विक्रम करणारा हेजलवूड यूवराज सिंगनंतरचा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
युवराज सिंगने वयाच्या १८ व्या वर्षी २००० साली भारतीय संघाला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकवून दिला होता. त्याने या विश्वचषकात संघासाठी महत्वाची ठरलेली अष्टपैलू खेळी केली होती आणि मालिकावीर ठरला होता. त्यानंतर २००७ मध्ये झालेला पहिला टी२० विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता आणि युवराज त्या संघाचा महत्वाचा भाग होता. तसेच २०११ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकातही युवराजने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि संघाने त्यावर्षी जेतेपद जिंकले होते. युवराजने या विजयात महत्वाचे योगदान दिले होते.
हेडलवूड युवराजनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे, ज्याने अंतिम सामन्यात खेळून देशासाठी ही तिन्ही जेतेपदे जिंकली आहेत. हेजलवूड २०१० मध्ये खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करत होता आणि त्याच्या संघाने त्यावर्षी हा विश्वचषक जिंकला होता.
तसेच २०१५ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता, ज्यामध्ये संघाला सहज विजय मिळाला होता. त्यानंतर आता रविवारी खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही तो ऑस्ट्रेलियाचा सदस्य होता आणि त्याच्या संघाने विजय मिळवला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्येही त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व करताना अंतिम सामना खेळला आणि त्यात विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कर्णधार असावा तर असा! धोनीच्या ‘त्या’ शब्दांनी युवा ऋतुराज गायकवाडमध्ये भरला होता आत्मविश्वास
अमेरिकेला मिळू शकते २०२४ टी२० विश्वचषकाचे यजमानपद, ‘हे’ आहे मोठे कारण
सचिन रिटायर झाला अन् ‘ते’ दोघेही रडू लागले