इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संगातील ऐतिहासिक ऍशेस मालिका सध्या खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात जयमान इंग्लंडला 2 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. उभय संघांतील दुसरा सामना बुधवारी (28 जून) लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंडच्या ताफ्यातील मोठा बदला समोर आला.
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या ऍशेस (Ashes 2023) सामन्यासाठी मंगळवारी (27 जून) म्हणजे एक दिवस आधीच इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन घोषित केली गेली. संघातील प्रमुख बदल म्हणजे इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) याचे नाव कमी केले गेले आहे. त्याच्या जागी उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोश टंग (Joshua Tongue) याला संघात घेतले गेले. एजबस्टनवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोईन अलीच्या हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून अष्टपैलू अद्याप सावरला नसल्यामुळे जोश टंगला संघात घेतले गेले.
जोश टंग काउंटी क्रिकेटमध्ये वॉर्सेस्टरशायर संघाकडून खेळतो. त्याने 1 जून 2023 रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यातील पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण दुसऱ्या डावात त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या. दुसरीकडे मोईन अलीने ऍशेस 2023 खेळण्यासाठी कसोटी निवृत्ती माघारी घेतली. पण दुशऱ्याच सामन्यात त्याला बेंचवर बसावे लागणार आहे.
ऍशेस 2023च्या दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड संघ:
बेन डकेट, झॅक क्रॉली, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जोनाथन बेयरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, ओली रॉबिन्सन, जोश टंग, जेम्स अँडरसन.
ऍशेस 2023 चे संपूर्ण वेळापत्रक
पहिला सामना – 16 जून (बर्मिंघम, एजबस्टन) – ऑस्ट्रेलिया विजयी
दुसरा सामना – 28 जून (लंडन, लॉर्ड्स) – दुपारी 3.30 मिनिटांनी सुरुवात
तिसरा सामना – 6 जुलै (लीड्स) – दुपारी 3.30 मिनिटांनी सुरुवात
चौथा सामना – 19 जुलै (मॅनचेस्टर) – दुपारी 3.30 मिनिटांनी सुरुवात
पाचवा सामना – 27 जुलै (ओव्हल, लंडन) – दुपारी 3.30 मिनिटांनी सुरुवात
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023: पुणेरी बाप्पा की ईगल नाशिक टायटन्स? कोण ठरणार क्वालिफायर 2 साठी पात्र?
क्रिकेटच्या महाकुंभाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात; बघा टीम इंडियाचे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक, कधी आणि कुणाशी भिडणार