भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सर्व खेळाडूंनी आपल्या कामगिरीची एक विशिष्ट चमक दाखवून दिली. त्यातही इंग्लंडचे खेळाडू मग तो जो रूट असो वा बेन स्टोक्स वा जेम्स अंडरसन यांनी भारतीय खेळाडूंची पुरती दैना करून सोडली. यामध्येच एक असा खेळाडू आहे ज्याने या सामन्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली, तो म्हणजे ‘जॅक लीच’.
पहिल्याच कसोटी सामन्यात केलेल्या या प्रदर्शनाने लीचने आपली प्रतिभा सर्वांना दाखवून दिली. परंतु फार कमी लोक त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणतात. आपल्या जीवनात त्याने बऱ्याच चढउतारांचा सामना केला आहे. मृत्यूशी झुंज देऊन तो पुन्हा परतला. आपले आयुष्य सोपे नसताना देखील त्याने दिलेला लढा आणि त्याची जगण्याची शैली ही कौतुकास्पद आहे. चला तर मंडळी जाणून घेऊया, त्याच्या जिवनाविषयी…
गंभीर आजाराने त्रस्त
लीचला ‘क्रोहन’ नावाचा आजार आहे, जो पचनप्रक्रियेत जळजळ निर्माण करतो. त्यामुळे त्याला अधिकाधिक संसर्ग होण्याची शक्यता होती. मागील वर्षी त्याला ‘सेप्सीस’ हा रोग झाला होता, ज्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. गतवर्षी इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. त्यावेळी लीच ‘गॅस्ट्रोएन्टेरिटीस’ आणि ‘क्रोहनमुळे’ कमकुवत झाला होता. तेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्याला ‘सेप्सीस’ झाले असल्याचे निदर्शनास आले.
समरसेट संघाचे प्रशिक्षक आणि लीचचे लहानपणीपासूनचे मार्गदर्शत जेसन केर यांनी याविषयी एका मुलाखतीत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, “लीच रुग्णालयात होता, त्याला ड्रीप लावले होते तेव्हा मी आणि त्याचे कुटूंबीय खूप काळजीत होते. बऱ्याच तासांकरिता त्याची अवस्था खूप गंभीर झाली होती. लीचला आपल्या जीवनात काहीही सहज नाही मिळाले. त्याला खूप मेहनत करावी लागली. त्याच्यात खूप इच्छाशक्ती आहे. त्यामुळे त्याने कधीही हार नाही मानली.
महा स्पोर्ट्सचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
चेन्नई कसोटीत खास कामगिरी
लीचसाठी चेन्नई कसोटीतील पहिला डाव फारसा चांगला राहिला नाही. पहिल्या डावात त्याने २४ षटकात एकूण १०५ धावा दिल्या. यादरम्यान त्याला एक २ विकेट्स घेता आल्या. त्यामुळे इंग्लंडच्या या गोलंदाजांला दुसऱ्या डावातही खास कामगिरी करता येणार असे वाटत होते. परंतु दुसऱ्या डावात सगळे उलटे झाले.
भारतासाठी अखेरच्या डावात इंग्लंडच्या ४२० धावांचा पाठलाग करणे ही फार सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे भारतीय संघ पहिला सामना ड्रॉ करेल, असा अंदाज होता. पण त्याचवेळी चेतेश्वर पुजाराला आपल्या चेंडूवर झेलबाद करून तंबूत जाण्यास लीचने भाग पाडले आणि खेळाची अजून रंगत वाढवली. याअगोदर रोहित शर्मा देखील काहीसा अशाच प्रकारे बाद झाला होता. पुढे त्याने आर अश्विन आणि शाहबाज नदीमची विकेट काढली. अशाप्रकारे पूर्ण सामन्यात सहा बळी घेत संघाला २२७ धावांनी विजय मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: ‘लाज नाही वाटत का, काय गाणं बनवलंय; माझी पोरं बोलायची बंद झालीत’, PSLचे गाणे पाहून भडकला शोएब
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला ‘तेंडुलकर-कूक ट्रॉफी’ नाव द्या, पाहा कुणी केलीय ही मागणी