तामिळनाडू आणि हरियाणा यांनी “५व्या कुमार/कुमारी फेडशन चषक कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.
भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश जिल्हा कबड्डी असो.वतीने नॉर्दन कोल्ड फिल्ड ली.च्या सहकार्याने काकरी जिल्हा सोनभद्र येथील एकलव्य क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूने दिल्लीचा विरोध ४०-३१असा मोडून काढत फेडशन चषक व रोख रु. १,००,०००/- ची कमाई केली.
उपविजेत्या दिल्लीला चषक व रोख रु.७१,०००/- वर समाधान मानावे लागले.
मुलींच्या अंतिम सामन्यात हरियाणाने तामिळनाडूचा प्रतिकार ४९-२९ असा संपुष्टात आणत फेडशन चषक व रोख रु.१,००,०००/- वर आपले नाव कोरले.
उप विजेत्या तामिळनाडूला चषक व रोख रु.७१,०००/-वर समाधान मानावे लागले.
या पराभवामुळे या स्पर्धेत तामिळनाडूला समिश्र यशावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र, साई या मुलींच्या,तर उत्तर प्रदेश, केरळ या मुलांच्या उपांत्य उपविजयी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु. २५,०००/- देऊन गौरविण्यात आले.