ओमानमधील सालालाह येथे सुरू असलेल्या ज्यूनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्युनियर आशिया चषक हॉकी 2023चा अंतिम सामना गुरुवारी (दि. 1 जून) खेळला गेला. या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 अशा प्रकारे पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केले. यासह भारताने सर्वाधिक चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली.
https://www.instagram.com/p/Cs9RadNNKbG/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
आठ वर्षानंतर होत असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा तर पाकिस्तानने मलेशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमण केले. अखेर बाराव्या मिनिटाला अंगद बीर सिंग याने मैदानी गोल करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर ही आघाडी दुप्पट करण्याचे काम संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या अरिजीत सिंग हुंडाळ याने केले. या दोघांच्या गोल मुळे भारताकडे हाफ टाइमपर्यंत 2-0 अशी आघाडी होती. त्यानंतर पाकिस्तानसाठी 37 व्या मिनिटाला अब्दुल बशारतने एकमेव गोल केला. भारतीय संघाने अखेरच्या काही मिनिटांमध्ये खेळ अत्यंत धीमा करत आपला पराभव होणार नाही याची काळजी घेतली.
या विजयासह भारताने चौथ्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे केली आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2004, 2008 व 2015 अशी तीन वेळा स्पर्धा आपल्या नावे केलेली. या विजयानंतर हॉकी इंडियातर्फे प्रत्येक खेळाडूंना दोन लाख तर सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींना प्रत्येकी एक लाखाचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. या विजयानंतर अनेक आजी-माजी हॉकीपटूंनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
(Junior Mens Asia Cup Hockey: India Beat Pakistan By 2-1 Clinch Fourth Title)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
WTC फायनलवर पावसाचे सावट! खेळ न झाल्यास असा ठरवला जाणार विजेता
धक्कादायक! इंग्लंड क्रिकेट संघाच्या बस समोर निदर्शने, लॉर्ड्स कसोटीआधी घडला प्रकार