---Advertisement---

ज्युनियर राष्ट्रीय वुशु चॅम्पियनशिप स्पर्धा: महाराष्ट्राला 3 रौप्य आणि ४ कांस्य

---Advertisement---

पुणे| १९ व्या ज्युनियर राष्ट्रीय वुशु स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली. हरियाणा येथील फतेहबाद येथे ही स्पर्धा झाली. हरियाणा वुशु असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्याच्या सलोनी जाधव हिने नॅनक्वॅन मध्ये २ रौप्य पदक आणि १ कांस्यपदक पटकाविले. स्वराज कोकाटे याने नॅनद्वू प्रकारात २ कांस्य पदकाची कमाई केली. तर ओमकार मोडक याने ताईजीजॅन मध्ये एक कांस्य तर सांगलीच्या सोनाली जाधव हिने रौप्य पदक पटकाविले.

सलोनी जाधव, ओमकार मोडक, सुरज कोकाटे हे तीनही खेळाडू पुण्यातील एस. के. स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये सोपान कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.

स्पर्धेत भारतातील ३० राज्यांचे संघ आणि ८०० स्पर्धक सहभागी झाले होते. ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनचे संभाजी झेंडे, महासचिव सोपान कटके यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---