ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर उरणार आहे. येत्या शनिवारपासून (२६ डिसेंबर) या सामन्याची सुरुवात होईल. तत्पुर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी मोठे भाष्य केले आहे. ऍडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांवर डाव घोषित केल्याची सहानुभूती आहे. परंतु ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यापूर्वी पाहुणा संघ दबावात असल्याचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.
“..म्हणून भारतीय संघ दबावाखाली असल्याचा आम्हाला आनंद”
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान पहिल्या डावात आघाडीवर असलेला भारतीय संघ दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांवर गारद झाला होता. तसेच कर्णधार विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्याचा भाग नसणार आहे. त्यामुळे भारतीय संघ पुढील सामन्यातील प्रदर्शनाबाबत तणावात असण्याची शक्यता आहे.
याविषयी बोलताना लँगर म्हणाले की, “आमचा संघ विराटच्या अनुपस्थितीचा चांगला फायदा घेईल. यामुळे नवा कर्णधार अजिंक्य रहाणे अजून जास्त दबावाखाली येईल. विरुद्ध संघासाठी मला खूप सहानुभूती आहे. मला माहिती आहे त्यांना यावेळी कसे वाटत असेल. पण भारतीय संघ आता दबावात असेल, तर मी खूप खुष आहे. कारण हा नाताळचा आठवडा आहे आणि सध्या आमच्या संघावर कसलाही तणाव नाही,” असे ते पुढे बोलताना म्हणाले.
“शास्त्रींच्या जागी असतो तरी खचलो नसतो”
तसेच जर या परिस्थितीत तुम्ही भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी असता, तर काय केले असते? हा प्रश्न लँगर यांना विचारण्यात आला. याचे उत्तर देताना लँगर म्हणाले की, “मी भारतीय संघाचे प्रशिक्षक शास्त्री यांच्या जागी असतो, तर मला कसलीही हरकत नसती. कारण मी स्वत: खूप तणावात्मक परिस्थितीचा सामना केला आहे.”
“विराट, शमीच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊ”
विराटबरोबरच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हादेखील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यातून बाहेर असणार आहे. कारण पहिल्या कसोटी सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मालिकेतील उर्वरित सामने खेळणार नाही. याविषयी बोलताना लँगर म्हणाले की, “तुम्ही कोणताही खेळ खेळत असाल आणि संघातील दोन स्टार खेळाडू बाहेर असतील. तर त्यांची उणीव भासते. विराट महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि शमीही खूप प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्यांच्या गैरहजेरीमुळे आम्हाला खूप फायदा होणार आहे.”
“कोणत्याही संघातील सर्वश्रेष्ट खेळाडू उपलब्ध नसतील, तर संघ आपोआपच कमजोर होतो आणि हेच वास्तव आहे. याचाच लाभ घेत सामन्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही भारतीय संघाला दबावाखाली आणणार आहोत,” असे ऑस्ट्रेलिया संघाच्या रणनितीविषयी बोलताना लँगर यांनी सांगितले.
‘ऍडलेडचा पराभव न विसरता मेलबर्न सामन्यात भारताने करावी नव्याने सुरुवात’, माजी दिग्गजाचा सल्ला
स्टार्कची गोलंदाजी खेळताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीच उडतेय भंबेरी; व्हिडिओ झाले व्हायरल