---Advertisement---

श्रेयस अय्यरच्या ‘के’ स्टिकरमागे दडलंय मोठं रहस्य

On: शुक्रवार, जून 10, 2022 8:28 PM
---Advertisement---

मागील ५-६ वर्षापासून भारतीय संघाशी निगडीत असलेला युवा फलंदाज श्रेयस अय्यरने कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याची दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. त्याला खेळपट्टीवर पाहताना एक गोष्ट लक्षात आली असेल. ती म्हणजे तो जेव्हा खेळायला येतो तेव्हा त्याच्या हातावर सध्या ‘के’ अक्षराचे स्टिकर दिसले.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामात श्रेयस (Shreyas Iyer) कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले आहे. या संपूर्ण हंगामातही त्याच्या हातावर हे स्टिकर दिसले होते. म्हणून हे स्टिकर कोलकाताचा ‘के’ असे नसून ते एक गॅजेट आहे.

हे एक फिटनेस गॅजेट असून त्याने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण आपोआप आणि लवकर कळते. बंगळुरूच्या ‘अल्ट्राह्यूमन’ या स्टार्टअपने हे गॅजेट तयार केले आहे. श्रेयसने या कंपनीशी करार केला तेव्हापासूनच तो हे घालून खेळताना दिसतो. याचे नाव ‘अल्ट्राह्यूमन एम १’ असे आहे. बाजारात याची किंमत मोठी असून ते आयफोनच्या ‘अल्ट्राह्यूमन’ ऍपला जोडले गेले आहे.

या गॅजेटमुळे तुम्हाला कधी खायचे, कधी पाणी प्यायचे आणि कधी व्यायाम करायचा हे पण कळते. तसेच हे गॅजेट तुमची एनर्जी लेव्हलही सांगते. मोहित कुमार आणि वत्सल सिंघल यांनी अल्ट्राह्यूमन कंपनीची स्थापना केली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पहिली विकेेट पडल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयसने सलामीवीर इशान किशनला चांगली साथ दिली. त्या दोघांनी पुढील १० षटकात १०२ धावांची भागीदारी केली. यावेळी इशानने ४८ चेंडूत ७६ आणि अय्यरने २७ चेंडूत ३६ धावा केल्या.

या सामन्यात श्रेयसकडून क्षेत्ररक्षणात झालेली मोठी चूक भारताच्या पराभवाचे कारण ठरली अशी चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावात १५व्या षटकापर्यत सामना बरोबरीत चालला होता. रस्सी वॅन डर दुसेन ३० चेंडूत २९ धावा करत स्ट्राईकवर होता, आवेश खानच्या त्या १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर श्रेयसने मि़ड विकेटला झेल सोडला. हे जीवनदान मिळताच दुसेनने पुढील १५ चेंडूत ४५ धावा केल्या.

हा सामना दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने जिंकला. डेविड मिलर-दुसेन या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद १३१ धावांची स्फोटक भागीदारी विशेष ठरली.

या मालिकेत भारतीय संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvsSA) दुसरा टी२० सामना बाराबाती स्टेडियम, कटक येथे १२ जूनला खेळला जाणार आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘भावा आयपीएल संपलीये’, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पंड्याने घेतली मिलरची फिरकी

इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गमावला T20 मालिकेतला पहिलाच सामना, तरीही भारताच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---