इंग्लंड मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सूरु आहे. विश्वचषक अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्युझीलंड चार संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. १४ जुलै ला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
विश्वचषकाच्या साखळी सामन्यादरम्यान मैदाना भोवती फिरत्या एलएडी स्क्रीन वर कबड्डीची जाहिरात बघायला मिळाली. क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर (१४ जुलै) अवघ्या सहा दिवसात २० जुलै पासून प्रो कबड्डी सीजन ७ ला सुरुवात होत आहे.
क्रिकेट विश्वचषकाचा प्रेक्षपन स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर दाखवलं जात. तर प्रो कबड्डीचा प्रेक्षपणाचा करार ही स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी झाला आहे. याचं पार्श्वभूमीवर प्रो कबड्डीची जाहिरात इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषकात बघायला मिळाली.
भारतात क्रिकेट नंतर सर्वाधिक बघितला जाणार लोकप्रिय कोणता खेळ असेल तर तो कबड्डी आहे. प्रो कबड्डीने कबड्डी खेळला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान कबड्डीची जाहिरात बघितला नंतर तो फोटो कबड्डी रसिकांकडून चांगलाच वायरल झालाय.
https://twitter.com/KhelKabaddiNews/status/1147804187465437188?s=19






