थोर कबड्डी संघटक कबड्डी महर्षी शंकरराव साळवी, तथा बुवा यांचा १५ जुलै रोजी जन्मदिन साजरा होत असतो. त्यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वत्र कबड्डी दिवस साजरा केला जातो. शंकरराव साळवी म्हणजेच बुवा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कबड्डीसाठी बहाल केले. कबड्डीला एक राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी बुवांचे योगदान सर्वात मोठे राहिले.
शंकरराव साळवी (Shankarrao Salvi) उर्फ बुवा यांचे कबड्डीवर विशेष प्रेम होतेच, पण त्याव्यतिरिक्त राजकार, प्रशासन, साहित्य, मनोरंजन अशा इतर क्षेत्रातही त्यांचे वजन होते. या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वत्र चांगली ओळख असल्यामुळे बुवांना कबड्डीसाठी योगदान देता आले. त्यांचे वकृत्वही अप्रतिम असल्याचे सांगितले जाते.
त्यांच्या कबड्डी प्रवासाची सुरुवात खऱ्या अर्थाने १९५० साली झाली होती. त्यावेळी कबड्डी खेळ खेळला तर जायचा, पण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे नाव वेगळे होते आणि नियमांमध्येही विविधता होती. उत्तरेकडे “कौन वडा”, पूर्वेकडे “हाडूडू”, दक्षिणेत “चेत्रूगुडू”, तर पश्चिमेत (महाराष्ट्रात) “हुतूतू” या नावाने कबड्डी खेळ खेळला जायचा. बुवांने कवड्डीसाठी सर्वप्रथम जो मोठा बदल केला, तो म्हणजे ‘बक’ यांचे नियम मोडीत काढले. त्यांनी दम आणि संघातील खेळाडूंची संख्या नऊ वरून सात केली. मुंबईत आणि महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या हुतूतूचे सर्व नियम कबड्डीसाठी लागू केले. त्याच वर्षी अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनची स्थापना करण्यात आली.
माजी मुख्यमंत्री यशवंतराच चव्हाणांसोबत बुवांचे जवळचे संबंध होते. तर बुवांचे दोन भाऊ शिवसेना नेत होते. यशवंतरावांनी बुवांची आणि शरद पवारांची पहिली भेट घालून दिली होती. १९८२ मध्ये दिल्लीत पार पडलेल्या एशियाड गेम्समध्ये कबड्डीचा समावेश केला जाणार होता, पण त्यावेळी महाराष्ट्रात काही महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडत असल्यामुळे ते शक्य झाले नव्हते. परंतु नंतर शरद पवारांनी इंदिरा गांधींची राजकीय मतभेद बाजूला ठेवून कबड्डीला एशियाडमध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न केले. १९९० साली पहिल्यांच बिजिंग एशियाडमध्ये कबड्डीचा समावेश झाला आणि बुवांचे स्वप्न साकार झाले.
बुवांना कबड्डीच्या रसिकांकडूनच ‘कबड्डीमहर्षी’ ही उपाधी मिळाली होती. त्यांनी कबड्डीसाठी केलेले आणखी एक महत्वाचे काम म्हणजे मनोहर जोशी महराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सरकारच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा घेण्यासाठी केलेले प्रयत्न. आर्थिक चणचणीमुळे ‘अश्विनीकुमार भोईर चषक’ ही कबड्डी स्पर्धा बंद पडण्याच्या मार्गावर होती. अशात मुख्यमंत्री जोशी यांनी अध्यादेश काढून ‘शिवशाही चषक’ ही राज्य रसकारची कबड्डी स्पर्धा सुरू केली. ही स्पर्धा आजरी खेळवली जाते, पण त्याचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी चषक’ असे केले गेले आहे. कबड्डीसाठी उभे आयुष्य बहाल केलेल्या या थोर व्यक्तिमत्वाने अखेर १५ फेब्रुवारी २००७ साली जगाचा निरोप घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसीची बांग्लादेशी खेळाडूवर मोठी कारवाई, छोट्याशा चुकीसाठी थेट १० महिन्यांसाठी केलं बॅन
भारताचे माजी दिग्गज क्रिकेटच्या पंढरीत एकवटले! धोनी अन् रैनाच्या फोटोंनी वेधले लक्ष