दुबईत सुरु असलेली कबड्डी मास्टर्स स्पर्धा पुढच्या टप्प्यात पोहचली आहे. काल, 27 जूनला या स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत.
त्यामुळे आता यातून भारत, पाकिस्तान, दक्षिण कोरिया आणि इराण हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पुढे आले आहेत.
साखळी फेरीनंतर गुणतालिकेत भारत आणि पाकिस्तान अ गटात तर ब गटात इराण आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांंकावर राहिले.
त्यामुळे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान विरुद्ध इराण असे संघ आमने सामने येणार आहेत.
या चार संघांपैकी आत्तापर्यंत भारत आणि इराणने सर्व सामने जिंकले आहेत. तसेच पाकिस्तान आणि दक्षिण कोरियाने 2 सामन्यात विजय मिळवला आहे.
हे उपांत्य फेरीचे सामने 29 जूनला होणार आहेत आणि अंतिम सामना 30 जूनला पार पडेल.
या स्पर्धेकडे आॅगस्ट सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी रंगीत तालिम म्हणून बघितले जात आहे. तसेच उपांत्य फेरीत पोहचलेले संघ एशियन गेम्समध्ये खेळणार असल्याने त्यांच्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे.
असे होतील उपांत्य फेरीतील सामने:
29 जून:
पाकिस्तान विरुद्ध इराण – रात्री 8 वाजता
भारत विरुद्ध दक्षिण कोरिया – रात्री 9 वाजता
महत्त्वाच्या बातम्या:
–महाराष्ट्राच्या कबड्डीपटूंना गरज आहे ती फक्त एका संधीची..
–कबड्डी मास्टर्स: पाकिस्तान, दक्षिण कोरियाची उपांत्य फेरीत धडक