मुंबई । भारतात क्रिकेटनंतर जा कोणता खेळ सध्या सर्वात जास्त प्रसिद्धीच्या शिखरावर आहे असं विचारलं तर साहजिकच कबड्डी असे नाव येते. आता हीच कबड्डी देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटला चांगलीच टक्कर देत आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या Broadcast Audience Research Council अर्थात बार्कच्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ या काळात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची लोकप्रियता ही मोठी होती. या काळात स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि हॉटस्टारच्या माध्यमातून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले गेले. हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे ही स्पर्धा अतिशय थाटामाटात पार पडली.
BARCच्या आकडेवारीप्रमाणे या काळात सोनी टेन १ वर दाखवण्यात आलेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी २४,६९,००० एवढ्या लोकांनी पाहिली. सोनी टेन ३ या चॅनेलवर हाच सामना हिंदी समालोचनासह दाखवण्यात आला होता. या चॅनेल या काळात हा सामना १३,७४,००० लोकांनी पहिला. याच काळात स्टार स्पोर्ट्स फर्स्टवरून कबड्डीचा सामना १३,७४,००० लोकांनी पाहिला. या काळात पाहिले गेलेले हे तीन पहिल्या क्रमांकाचे टेलिव्हिजनवरील कार्यक्रम होते. सोनी टेन २ वरील डब्लूडब्लूइपेक्षाही कबड्डीची लोकप्रियता या काळात जास्त होती.
या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा चॅनेलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात आली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या संघाने या स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनी विजेतेपद जिंकले.
https://twitter.com/BARCIndia/status/951427471685050368