क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी इत्यादी खेळ खेळण्याची आवड अनेकांना असते. परंतु कधी कधी हेच आवडते खेळ काहींच्या अकनाक मृत्यूचे कारण ठरतात. लाईव्ह सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने, हृदयविकाराचा झटका आल्याने किंवा इथर कारणांमुळे क्रिडापटूंनी जीव गमावल्याची उदाहरणे आहेत. असेच काहीसे तमिळनाडूतील एका स्थानिक कबड्डी स्पर्धेतील सामन्यादरम्यान घडले आहे. कबड्डी सामन्यादरम्यान २२ वर्षीय कबड्डीपटूचा अकनाक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
तमिळनाडूतील पनरुती शहरानजीक मणदिकुप्पम गावातील कबड्डी सामन्यादरम्यान (Kabbadi Player Died) विमल राज (Vimalraj) नावाच्या युवा कबड्डीपटूचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. विमल सालेम जिल्ह्यातील एका खाजगी महाविद्यालयातील विद्यार्थी होता. त्याच्या मृत्यूचे कारणही थक्क करणारे आहे.
सामन्यादरम्यान दुर्देवी मृत्यू
मणदिकुप्पम गावात एक कबड्डी सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान विमल विरोधी संघाच्या ताफ्यात रेड करण्यासाठी गेला असता त्याचा जीव गेला. या घटनेशी संबंधित व्हिडिओ पुढे आला आहे, ज्यामध्ये कबड्डीपटू विमल विरोधी संघाच्या ताफ्यात रेड मारायला गेला असता, विरोधी संघातील खेळाडू त्याला अडवताना त्याच्या अंगावर पडतात.
रेड मारायला गेलेल्या विमलला विरोधी संघातील खेळाडूंनी घेरा घातला होता. तरीही तो खेळाडूंना चकमा देत त्यांच्यावरून उडी मारत पुढे येतो. मात्र एक खेळाडू त्याला अडवण्यासाठी मागून धावत येतो आणि त्याला पकडतो. यादरम्यान त्याचा पाय विमलच्या छातीवर पडतो. विमलला त्याचे २ गुण मिळतात. पण त्या प्रसंगानंतर तो जागचा उठूच शकत नाही. मग लगेचच सर्व खेळाडू त्याच्याजवळ येऊन त्याला उठवू लागतात. परंतु त्याने कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
विमलच्या मृत्यूनंतर पोलिस याप्रकरणी चौकशी करत आहेत. विमलला या प्रसंगादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. मात्र पोलिसांना हा मर्डर असल्याची शंका असल्याने त्यांनी विमलचे मृत शरीर पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शॉकिंग! मुंबईत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या, २ तास जागेवरच होता पडून
मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा
“हुड्डा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरतोय”