---Advertisement---

इतकी हिंमत!! पंतला धावबाद करण्यासाठी रबाडाची चिटिंग, भर मैदानात भारतीय कर्णधाराला दिला धक्का

Rabada-Pushed-Pant
---Advertisement---

दिल्ली| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात गुरुवारी (०९ जून) ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात ७ विकेट्स राखून हे आव्हान पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान भारताचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा यांच्यात टक्कर झाल्याचे दिसले.

रिषभ पंतला रडाबाने लाईव्ह सामन्यात दिला धक्का
त्याचे झाले असे की, भारतीय संघाच्या (IND vs SA) डावादरम्यान १४व्या षटकात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाजी करत होता. यावेळी नॉन स्ट्राईकवर रिषभ पंत (Rishabh Pant) होता. दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज रबाडा (Kagiso Rabada) हे षटक फेकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील पहिल्या चेंडूवर श्रेयसने हलक्या हाताने फटका मारला, ज्यानंतर दोघेही १ धाव घेण्यासाठी पळाले. परंतु चेंडू जास्त दूर न गेल्याने श्रेयसने धाव घेण्यास नकार दिला. 

यावेळी क्रिज सोडून धाव चोरण्यासाठी पळालेल्या पंतची रबाडासोबत टक्कर (Kagiso Rabada Pushed Rishabh Pant) झाली. श्रेयसने मारलेला चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या रबाडाचा नजरचुकीने पंतला धक्का लागला. त्यामुळे पंतचे स्वतवरील नियंत्रण सुटले. रबाडाने पंतला चुकून हा धक्का मारला होता की मुद्दाम, हे समजले नाही. परंतु त्यानंतर त्याने त्वरित आपले दोन्ही हात मागे घेतले.

https://twitter.com/vip_jangid/status/1534908762930065408?s=20&t=xqtAI-xOD6Y8-VKzqd10yg

https://twitter.com/mainlycricket/status/1534906483875295232?s=20&t=xqtAI-xOD6Y8-VKzqd10yg

दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी मात्र या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक ट्रिस्टन स्टब्सने चेंडू पकडून पंतला धावबाद करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या खराब थ्रोमुळे आणि पंत लगेचच आपली विकेट वाचवण्यासाठी माघारी फिरल्याने त्याचे प्रयत्न विफळ ठरले. अशाप्रकारे पंतने स्वत:ला धावबाद होण्यापासून वाचवले.

https://twitter.com/j_dhillon8/status/1534906177129426945?s=20&t=tUjycKeu3WPrIGjgzLIq0Q

रबाडाने पंतची मागितली क्षमा
यानंतर मात्र रबाडा स्वत: पंतजवळ गेला आणि त्याने आपल्याकडून घडलेल्या कृतीची क्षमा मागितली. त्याने पंतशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी निघून गेला. रबाडाची ही कृती पाहून पंतच्याही चेहऱ्याच स्मितहास्य खुलले.

या जीवनदानानंतरही पंतला विशेष फलंदाजी करता आली नाही. तो १६ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने २९ धावा करून बाद झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

काय सांगता!! एकाच संघातून खेळले होते ६ भाऊ? पाहा कोणी कशी कामगिरी केली होती

मिलर-दुसेन जोडीकडून धावांचा मारा, भारतीय संघापुढे भारतातच रचली सर्वात मोठी भागीदारी

दक्षिण आफ्रिकेचा एक विजय टीम इंडियाला पडला महागात! धुळीस मिळालं इतिहास रचण्याचं स्वप्न

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---