---Advertisement---

भज्जीचा राग शांत होईना! कामरान अकमलला म्हटलं ‘नालायक’, शिखांच्या इतिहासाची आठवण करून दिली

On: बुधवार, जून 12, 2024 12:08 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर शिख धर्मावर एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानं भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला उद्देशून हे विधान केलं होतं. याता याचे पडसाद उमटू लागले आहेत.

कामरानच्या वक्तव्यावरून भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं त्याचा चांगलाच समाचार घेतला होता. भज्जीनं ट्वीट करत कामरानवर टीका केली होती. यानंतर कामरान अकमलनं माफी मागितली. मात्र भज्जीचा राग अजूनही शांत झालेला नाही. हरभजन सिंगनं कामरान अकमलवर पुन्हा एकदा टीका करत त्याला ‘नालायक’ म्हटलं आहे.

हरभजन सिंग ‘एनआय’शी बोलताना म्हणाला, “हे अत्यंत मूर्खपणाचं विधान असून असं एखादा ‘नालायक’ व्यक्तीच करू शकतो. कामरान अकमलला हे समजलं पाहिजे की कोणत्याही धर्माची थट्टा उडवण्याची गरज नाही. कामरान अकमलला शिखांचा इतिहास माहित आहे का? शिख कोण आहेत आणि त्यांनी त्याच्या पूर्वजांना, त्याच्या आया-बहिणींना वाचवण्यासाठी काय केलंय हे त्याला माहित आहे का? नसेल माहित तर तुमच्या पूर्वजांना विचारा. रात्रीचे 12 वाजले…असं म्हणून शिखांची थट्टा उडवू नका. कारण शिख रात्री 12 वाजता मुघलांवर हल्ला करून तुमच्या आया-बहिणींची अब्रू वाचवत होते.”

 

हरभजन सिंगच्या ट्वीटनंतर कामरान अकमलनं त्याच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अकमलनं ‘X’ वर लिहिलं, “मी माझ्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतो आणि हरभजन सिंग व संपूर्ण शिख समुदायाची माफी मागतो. माझे शब्द चुकीचे आणि अपमानजनक होते. मी जगभरातील शिखांचा अत्यंत सन्मान करतो. माझा कोणाच्याही भावनांना ठेच पोहचवण्याचा हेतू नव्हता.”

महत्त्वाच्या बातम्या – 

“तुला लाज वाटली पाहिजे”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूनं शिख धर्माची खिल्ली उडवल्यानंतर हरभजन सिंग भडकला
भारत-पाकिस्तान सामन्यात सट्टेबाजांची चांदी! कॅनेडियन रॅपरनं जिंकले कोट्यवधी रुपये
“कृपया लक्ष द्या!” उमर अकमलची ही कसली पोस्ट? कमेंट्स वाचून तुम्ही पोट धरून हसाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---