क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक भावांच्या जोड्या खेळल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कामरान अकमल आणि उमर अकमल ही पाकिस्तानी क्रिकेटपटू असलेल्या भावांची जोडी. यातील उमर अकमलला २० फेब्रुवारी २०२० पासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित केले होते. पण आता त्याच्यावर ४२,५०,००० पाकिस्तानी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरल्यानंतर आणि पाकिस्तानच्या रिहॅबिलिटेशन प्रोग्राममधून गेल्यानंतरच तो प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळण्यास पात्र ठरणार आहे.
त्यामुळे त्याचा भाऊ कामरानने त्याचा दंड आपल्या पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) वेतनातून भरण्याची तयारी दाखवली आहे. तो म्हणाला, ‘मी माझ्या भावाचा दंड भरण्यास तयार आहे. मी पीसीबीला विनंती करतो की ते पीएसएल सामन्यांसाठी मला मिळणारी रक्कम वजा करु शकतात. पैसे हा इतका मोठा मुद्दा असू नये.’
तो पुढे म्हणाला, ‘ते माझी फी आणि अगदी उमर जेव्हा पण खेळण्यास सुरु करेल तेव्हा देखील पैसे पीसीबीकडूनच येणार आहेत. मी पीसीबीला विनंती करतो की ते थोडी उदारता दाखवतील कारण उमर दंड भरण्यास तयार आहे.’
कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने फॉर स्पोर्टने उमरच्या निलंबणाचा कालावधी १२ महिन्यांपर्यंत कमी केला होता. परंतु, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भ्रष्टाचारविरोधी नियम तोडल्याबद्दल उमरवर ४२,५०,००० रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल २०२० मध्ये पीसीबीच्या शिस्त समितीने उमरला दोन वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते आणि ३ वर्षे बंदीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने फॉर स्पोर्ट्सने उमरचे तीन वर्षांचे निलंबन १८ महिन्यांपर्यंत कमी केले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा कारवाई करताना कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनने फॉर स्पोर्ट्सचा निर्णय मान्य केला पण उमरवर एवढा मोठ्या रक्कमेचा दंड ठोठावला गेला, जो फेडणे सोपे होणार नाही.
उमरेने त्याच्या कारकिर्दीत १६ कसोटीत १००३ धावा, १२१ वनडेत ३१९४ धावा आणि ८४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत १६९० धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका ‘अशा’ फरकाने जिंकेल टीम इंडिया, ‘द वॉल’ द्रविडची भविष्यवाणी
पाहाव ते नवलंच! चक्क हत्ती करतोय फलंदाजी, व्हिडिओ पाहून व्हाल चकीत