भारतीय क्रिकेट संघाचा सध्या सुवर्णकाळ सुरु आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील हा संघ जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक ओळखला जातो. जून महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ तेथेच राहणार आहे.
यादरम्यान, भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल हे देखील निश्चित झाले असून या संघाची लवकरच घोषणा होईल. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल याने भारतीय संघ व भारतीय क्रिकेट वर्तुळाचे कौतुक केले आहे.
भारतातील पायाभूत सुविधा दर्जेदार
पाकिस्तानच्या दिग्गज यष्टीरक्षकांपैकी एक असलेल्या कामरान अकमलने ट्विटरवर बोलताना म्हटले, ‘मला भारतीय क्रिकेट संघ व संपूर्ण संघटनांचे कौतुक करू वाटते. पूर्ण श्रेय या मानसिकतेला जाते. लवकरच आपण भारताचे दोन संघ खेळताना पाहू. माझे असे स्पष्ट मत आहे की, भारताने तृतीय दर्जाचा संघ खेळवला तरी तो श्रीलंकेला आरामात पराभूत करील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पायाभूत सुविधा अत्यंत दर्जेदार केल्या आहेत. सर्व भारतीय खेळाडू आर्थिकदृष्ट्याही सक्षम झालेत.’
आजी-माजी क्रिकेटपटूंचे केले कौतुक
अकमलने आपले म्हणणे पुढे नेताना भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंचे कौतुक केले. तो म्हणाला, ‘राहुल द्रविडने मागील सात-आठ वर्षात युवा खेळाडूंसोबत भरपूर काम केले आहे. त्याचाच हा परिणाम असून भारतीय संघ एका शिखरावर पोहोचलाय. रवी शास्त्री यांनी देखील वरिष्ठ संघासोबत कष्ट घेतले आहेत. सौरभ गांगुलीपासून आता विराट कोहलीपर्यत सर्व कर्णधार एकापेक्षा एक लाभले. भारताकडे सध्या राष्ट्रीय कर्णधारासाठी अनेक पर्याय आहेत.’
पाकिस्तानसाठी तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळलेला अकमल सध्या समालोचक म्हणून पुढे येतोय. त्याचा भाऊ उमर हादेखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असून, मागील वर्षी झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात ऊन त्याला आता क्लिनचिट मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कमिन्सने निवडली वर्ल्ड टेस्ट इलेव्हन; भारताच्या ‘या’ चार खेळाडूंना मिळाले स्थान
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला मिळाला नवा सलामीवीर, ७३ ची आहे सरासरी
बीसीसीआयने टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी मागितला एक महिन्याचा अवधी, ‘हे’ आहे कारण