सध्याच्या स्थितीत विराट कोहली, बाबर आझम यांसारखे काही स्टार खेळाडू आहेत. अशातच पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलला वाटते की पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा फलंदाज सौद शकील येत्या काही वर्षांत विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यासारखा मोठा खेळाडू होऊ शकतो. याबाबत त्याने वक्तव्य केले आहे.
माध्यमातील वृत्तांनूसार अकमल म्हणाला की, “मी सौद शकील (Saud Shakeel) कडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आहे. मी त्याचा विचार विराट कोहली, बाबर आझम आणि इतर पाच-सहा महान खेळाडूंच्या यादीत करतो. सौद पुढील तीन ते चार वर्षांत या खेळाडूंच्या जवळ पोहोचला पाहिजे. त्याने केलेली कामगिरी ही कौतुकास्पद आहे. विशेषतः फलंदाजीसाठी जेव्हा परिस्थिती कठीण होती, तेव्हा त्याने हे प्रदर्शन केले आहे.”
अकमल पुढे म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये सुरुवातच्या काळात एखादा फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करतो. तेही अगदी लहान वयात, तेव्हा तो एक महान खेळाडू बनू शकतो. म्हणूनच पाकिस्तान क्रिकेटच्या दृष्टीने हे एक चांगले संकेत आहेत.” श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत आपल्या फलंदाजीचा प्रभाव टाकणारा सौद शकील वनडे मालिकेत काही अंशी संयमी खेळी करताना दिसला. मात्र, आता त्याचा अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात घेतले गेले आहे. परंतु सौद आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाचा भाग नाही.
नुकत्याच झालेल्या श्रीलंका आणि पाकिस्तान संघातील कसोटी मालिकेत शकीलने द्विशतक ठोकले. तो श्रीलंकेत द्विशतक करणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरला. डिसेंबरमध्ये पदार्पण केल्यापासून सहा कसोटींमध्ये त्याने एक द्विशतक, एक शतक आणि पाच अर्धशतके केली आहेत. (kamran akmal says this young player is reach the level of virat kohli and babar azam)
महत्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीयाने स्विंगच्या जोरावर 15 वर्ष दिला त्रास, ऍरॉन फिंचने स्वतः केले मान्य
हे पहिल्यांदाच घडतयं! जर्सीवर पाकिस्तानचे नाव लावून खेळणार टीम इंडिया, पण का?