टी२० विश्वचषकात नामिबिया आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धेतील ३६ वा सामना खेळला गेला. हा सामना शुक्रवारी (५ नोव्हेंबर) शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नामिबियावर ५२ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंड संघासाठी हा टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वातील तिसरा विजय ठरला आहे. यानंतर संघाने गुणतालिकेत त्यांचे दुसरे स्थान भक्कम केले आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने मिळवलेला विजय कर्णधार केन विलियम्सनसाठी अधिक महत्वाचा ठरला आहे. विलियम्सनने या विजयानंतर स्वत:च्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद केली आहे.
टी२० विश्वचषकात केन विलियम्सनच्या नेतृत्वात न्याझीलंडने यावर्षी मिळवलेला हा तिसरा विजय असून एकंदरित टी२० विश्वचषकातील विजयांचा विचार केला तर केन विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने सर्वाधिक सामने जिंकले आहे. केन विलियम्सनने न्यूझीलंड संघाला टी२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकवून दिले आहे.
न्यूझीलंडने टी२० विश्वचषकात आतापर्यंत विलियम्सनच्या नेतृत्वात एकूण ७ विजय मिळवले आहेत. विलियम्सनने या विक्रमाच्या यादीत डॉनियल व्हिटोरीला मागे टाकेल आहे. यापूर्वी हे दोघे ६ विजयांसह बरोबरीवर होते, पण नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर विलियम्सनने व्हिटोरीला मागे टाकले आहे.
दरम्यान, न्यूझीलंड आणि नामिबिया यांच्यात शुक्रवारी पार पडलेल्या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत असताना चार विकेट्सच्या नुकसानावर १६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबिया संघ मर्यादित २० षटकांमध्ये सात विकेट्सच्या नुकसानावर १११ धावांपर्यंत पोहोचू शकला. परिणामी न्यूझीलंडने सामन्यात ५२ धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स आणि जेम्स निशम या दोघांनी महत्वाची खेळी केली. तसेच ग्लेन फिलिप्सने २१ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. तर जेम्स निशमने २३ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३५ धावा केल्या. याव्यतिरिक्त कर्णधार केन विलियम्सनने २५ चेंडूत २५ धावा करून संघाला अपेक्षित धावसंख्या करण्यामध्ये योगदान दिले.
गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदी या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. जेम्स निशमला त्याच्या उत्कृष्ट खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच निवडले गेले.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा कर्णधार विराट १८ नंबरची जर्सी का घालतो? कारण आहे खूपच भावूक
विराट कोहलीने जेव्हा गोलंदाजांची पळता भूई थोडी केली होती, वाचा ५ सर्वोत्तम खेळींबद्दल सविस्तर
‘बर्थडे बॉय’ विराट स्कॉटलंडविरुद्ध मैदानात पाय टाकताच ‘हा’ विक्रम करणारा जगातील पहिलाच कर्णधार