आयसीसी वनडे विश्वचषक 2023चे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) समोर आले. वेळापत्रकारूनास क्रिकेटची ही प्रमुख स्पर्धा 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. यादरम्यान विश्वचषकाशी संबंधित अजून एक मोठी माहिती समोर येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनल आगामी वनडे विश्वचषकात खेळणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, आता विलियम्सनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.
केन विलियम्सन (Kane Williamson) न्यूझीलंड वनडे संघाचा नियमित कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगामात विलियम्सन गुजरात टायटन्सचे प्रतिनित्व करत होता. पण त्याने हंगामातील पहिल्याच सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली आणि आयपीएल 2023मधून तो बाहेर पडला. माध्यमांमध्ये अशा बातम्याही आल्या की विलियम्सनलची दुखापत आगामी वनडे विश्वचषकापूर्वी ठीक होईल, अशी शक्यता नाहीये. याच पार्श्वभूमीवर यावर्षी तो वनडे विश्वचषक खेळणार नाही, असेच दिसत होते. पण ताज्या माहितीनुसार 32 वर्षीय विलियम्सनल आगामी विश्वचकापूर्वी पूर्णपणे फिट होऊ शकतो. माहितीनुसार तो आपल्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून झटपट सावरताना दिसत आहे.
विलियम्सनच्या दुखापतीची माहिती न्यूझीलंडच्या मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड (Gary Stead) यांच्याकडून मिळाली. प्रशिक्षकांच्या माहितीनुसार, “आधी आम्ही या दिग्गज खेळाडूला विश्वचषकात मेंटॉर म्हणून पाठवणार होतो. पण त्याच्या त्याच्यात वेगाने होणारी सुधारणा पाहून असे वाटत आहे की, विश्वचषक जवळ येता-येता तो खेळाडू म्हणून संघात सामील होऊ शकतो.”
दरम्यान, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर देखील विलियम्सनच्या दुखापतीविषयी माहिती दिली गेली आहे. व्हिडिओत विलियम्सन दुखापतीतून सावरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सराव करत आहे. व्हिडिओत विलियम्सनने चाहत्यांसाठी संदेश दिला की, “मला याआधी कधीच एवढी मोठी दुखापत झाली नव्हती. पण अनेकांसोबत चर्चा केल्यानंतर असे वाटले की, खूप लांबचा विचार करण्याची गरज नाही. प्रत्येक आठवड्यात आपली प्रगती होत राहील, असाच प्रयत्न आहे.” विलियम्सनच्या माहितीनुसार वनडे विश्वचषकात खेळण्यापेक्षा आधी दुखापतीतून सावरण्याला तो प्रथमिकता देणार आहे. (Kane Williamson can play for the team in the ODI World Cup, according to New Zealand coaches)
महत्वाच्या बातम्या –
WC 2023 । बीसीसीआयची जंगी तयारी! विश्वचषकच्या ट्रॉफीचे अनावरण थेट स्पेसमध्ये
BREAKING: सपना गिल प्रकरणात पृथ्वीला क्लीनचीट! मुंबई पोलिसांचा जबाब ठरला निर्णायक