भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेपूर्वीच न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला संघाचा स्टार फलंदाज केन विलियम्सन आता फिट होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच नेट्समध्ये सराव करत असलेला केन आता थेट न्यूझीलंड संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला असून, संघासोबत सराव करत आहे.
https://twitter.com/BLACKCAPS/status/1687364836941070336?t=0LJg9lKmZrC__2KpfSQSHQ&s=19
केन विलियम्सन (Kane Williamson) याने दुखापतीतून पुनरागमन करत फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी विलियम्सनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो फलंदाजी करताना दिसत आहे. खास बाब अशी की, विलियम्सन या व्हिडिओत पूर्णपणे फिट असल्याचे दिसत आहे आणि तो त्याचे सर्व क्रिकेट शॉट्स मारत आहे. यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा आणखीच वाढल्या आहेत.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्विटर हँडल वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो संवाद साधताना दिसला. यादरम्यान त्याने पुन्हा संघाशी जोडून आणि काही नवे चेहरे पाहून आनंद झाल्याचे म्हटले. या व्हिडिओमध्ये तो कशाप्रकारे पुनरागमनासाठी मेहनत घेत होता हे देखील दिसून येत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत विलियम्सन गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग होता. हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना विलियम्सन याला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याचे ऑपरेशनही करावे लागले होते. त्यानंतरपासून त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा कमी झाल्या होत्या. मात्र, ज्याप्रकारे त्याने रिकव्हरी केली आहे, त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत.
(Kane Williamson Join Newzealand Cricket Team After Getting Fit)
महत्त्वाच्या बातम्या-
क्या बात है! विस्फोटक खेळीनंतर तिलकला दक्षिण आफ्रिकेहून कुणी पाठवला व्हिडिओ मेसेज? वाचा बातमी
विंडीजने मोडला भारताचा गर्व! 200व्या सामन्यात रोखला विजयरथ; काय होता 1, 50, 100 अन् 150व्या सामन्याचा निकाल?






