लंडन। आज(14 जूलै) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना मार्टिन गप्टिलची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर कर्णधार केन विलियम्सनने आणि हेन्री निकोल्सने दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. मात्र लियाम प्लंकेटने विलियम्सनला 30 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
विलियम्सन या सामन्यात 30 धावांवर बाद झाला असला तरी त्याने या सामन्यात खास पराक्रम केला आहे.
विलियम्सनचे या विश्वचषकात 10 सामन्यात 82.57 च्या सरासरीने 578 धावा झाल्या आहेत. त्यामुळे तो एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम माहेला जयवर्धनेच्या नावावर होता.
जयवर्धनेने 2007 च्या विश्वचषकात श्रीलंकेचे नेतृत्व करताना 11 डावात 60.88 च्या सरासरीने 548 धावा केल्या होत्या.
याबरोबर एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विलियम्सन सहाव्या स्थानावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या केल्या होत्या.
#एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार-
578 – केन विलीयम्सन, 2019
548 – माहेला जयवर्धने, 2007
539 – रिकी पाॅटींग, 2003
507 – एराॅन फिंच, 2019
482 – एबी डिव्हीलियर्स, 2015
#एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू –
673 – सचिन तेंडूलकर, 2003
659 – मेथ्यू हेडन, 2007
648 – रोहित शर्मा, 2019
647 – डेव्हिड वॉर्नर, 2019
606 – शाकिब अल हसन, 2019
578 – केन विलियम्सन, 2019
549 – जो रुट, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: हे माहित आहे का? आज मैदानावर उपस्थित असणाऱ्यांपैकी हा एकमेव व्यक्ती आहे विश्वविजेता
–विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-इंग्लंड सामना टाय झाला तर हा संघ होणार विश्वविजेता…
–सेमीफायनलमध्ये हरल्यानंतरही टीम इंडियाला मिळणार कोट्यावधी रुपये