fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विश्वचषक २०१९: न्यूझीलंड-इंग्लंड सामना टाय झाला तर हा संघ होणार विश्वविजेता…

लंडन। आज(14 जूलै) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामना लॉर्ड्स मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो पहिल्यांच विश्वचषक विजेता ठरणार आहे.

या विश्वचषकातील बाद फेरीचे म्हणजेच उपांत्य सामने आणि अंतिम सामना जर बरोबरीत सुटला तर यावर्षी पहिल्यांदाच सुपर ओव्हर संकल्पना वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे आजचा अंतिम सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर घेतली जाईल. त्यानुसार या सुपर ओव्हरमध्ये जो संघ विजेता ठरेल तो विश्वचषकविजेता घोषित करण्यात येईल. त्यामुळे हा सामना जरी बरोबरीत सुटला तरी साखळी फेरीच्या गुणतालिकेतील गुण किंवा नेटरनरेट विजेता घोषित करण्यासाठी लक्षात घेतले जाणार नाही.

आजच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी उपांत्य सामन्यात खेळवलेले 11 जणांचे संघच कोणताही बदल न करता कायम ठेवले आहेत.

न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात भारताचा पराभव करत तर इंग्लंडने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

सेमीफायनलमध्ये हरल्यानंतरही टीम इंडियाला मिळणार कोट्यावधी रुपये

एमएस धोनीला रनआऊट केल्याबद्दल मार्टिन गप्टिल म्हणतो…

एमएस धोनीला ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचे रवी शास्त्री सांगितले कारण…

You might also like