न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने 2016 साली टी-20 विश्वचषकच्या उपांत्य सामन्यामध्ये धडक मारली होती. त्यानंतर या संघाने 2019 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत सुद्धा अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. त्याचबरोबर आता हा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसर्या स्थानी आहे. सध्या सुरू असलेल्या कसोटी चॅम्पियनशिपमध्ये देखील हा संघ अंतिम सामना खेळण्याची शक्यता आहे. कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 2021 मध्ये होणार आहे. हा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र, सध्या हा संघ पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळेल. यापूर्वी नुकतेच विलियम्सनने एका मुलाखतीमध्ये भारतीय संघाचा ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीची प्रशंसा केली आहे.
केन विलियम्सनला विचारले होते की, इतिहासात असा कोणता कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्त्वाखाली तू खेळायला पसंत करशील? यावर उत्तर देताना केन विलियम्सन म्हणाला, “एमएस धोनी ज्या प्रकारे गोष्टी हाताळतो, मला ती शैली खूप आवडते.” विलियम्सन हा न्यूझीलंड संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. परंतु धोनीने 2014 साली कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याने मर्यादित षटकांचे सुद्धा नेतृत्त्व सोडले आहे.
टी-20 विश्वचषक स्पर्धेत 2016 साली साखळी सामन्यात न्यूझीलंड संघाने धोनीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाला 47 धावांनी पराभूत केले होते. केन विलियम्सनच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने द्विपक्षीय मालिकेत कठीण आव्हान दिले होते. या संघाने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. ही मालिका धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळली गेलेली शेवटची मालिका होती. यानंतर धोनीच्या नेतृत्वाचा कालखंड समाप्त झाला.
एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला पहिल्या क्रमांकावर पोहचवले होते. त्याचबरोबर भारतीय संघाला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या होत्या. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 साली वनडे विश्वचषक आणि 2013 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी मिळवून दिल्या होत्या.
आयपीएल स्पर्धेत सुद्धा धोनी सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करताना तीनवेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. मात्र, केन विल्यम्सन धोनीच्या नेतृत्त्वाखाली कधी खेळू शकला नाही. तो डेविड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखाली सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयच्या बैठकीमध्ये घेतले गेले ‘हे’ प्रमुख १० निर्णय, वाचा पूर्ण माहिती
‘मी काय करू मग? सोडून टाकू सगळं?’, केएल राहुलला दुसऱ्या कसोटीत संधी न दिल्याने मिम्स व्हायरल
स्मिथची प्रतिक्षा आणखी वाढली! ऑस्ट्रेलियात असून ‘एवढे’ महिने भेटला नाही पत्नीला