इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात ६ विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला हैदराबाद संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी बाद १३४ धावा करू शकला. यानंतर चेन्नईने विजयासाठीचे १३५ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत ६ गडी शिल्लक असतानाच गाठले.
हैदराबादसाठी ११ व्या सामन्यातील हा ९ वा पराभव होता. त्यामुळए हैदराबाद संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पराभवानंतर विलियम्सन म्हणाला, या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. हे आपण सामन्याच्या पूर्वार्धात पाहिले होते. आमच्याकडे पुरेशा धावा नव्हत्या. असे असूनही आम्ही चेन्नई संघाचा चांगला मुकाबला केला. विशेषतः सामन्याच्या शेवटच्या १० षटकांमध्ये आम्ही चांगला खेळ केला. आम्हाला आमच्या खेळात छोटे बदल करावे लागतील. आम्ही आशा प्रकारचे बदल सतत करत राहणे महत्वाचे आहे.
जेसन रॉयची सुरुवातीला विकेट गमावल्याने त्याचा संघावर परिणाम झाला का, या प्रश्नाला उत्तर देताना विलियम्सन म्हणाला, पॉवरप्लेच्या शेवटी आम्ही जवळपास ४० धावा केल्या होत्या. जे परिस्थितीच्या दृष्टीने वाईट नव्हते. साधारणपणे इतक्याच धावा पॉवरप्लेमध्ये होत असतात. मधल्या फळीत काही खेळाडूंच्या छोट्या, पण झटपट खेळीमुळे आम्ही सन्मानजनक धावसंख्या उभारू शकलो. पण ते जिंकण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. आम्हाला आमच्या संघात सातत्याने सुधारणा करावी लागेल.
पुढे कशा पद्धतीने सामना कसा जिंकू शकतो ते बघावे लागेल. पराभूत संघात असणे कठीण काम असते. चेन्नईचा संघ खरोखरच चांगला खेळला. हा सामना आव्हानात्मक होता आणि जर शेवटी आमच्याकडे आणखी १०-१५ धावा असल्या असत्या तर त्यांनाही अडचणींना सामोरे जावे लागले असते.
येत्या ३, ६ आणि ८ ऑक्टोबर रोजी सनरायझर्सला त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा सामना करावा करेल. अशा परिस्थितीत त्यांचा कोणत्याही संघाविरुद्धचा विजय तिन्ही संघांचे प्लेऑफचे समीकरण बिघडवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘सांगलीकर’ स्म्रीती मंधनाने गाजवले ऑस्ट्रेलियाचे मैदान, विराटनंतर ‘अशी’ कामगिरी करणारी दुसरीच भारतीय
“धोनीने ज्याप्रकारे विजयी षटकार मारला, त्यामुळे विरोधी संघांनी आता घाबरले पाहिजे”
‘हे’ आहे चेन्नईच्या यशाचे प्रमुख कारण; वरिष्ठ खेळाडूने केला खुलासा






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर