दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने आक्रमक फलंदाजी करत दमदार अर्धशतक झळकावले आहे. त्याने आपल्या खेळीने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने ८५ धावांची अद्भुत खेळी खेळली होती. आपल्या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वोच्च धावांची खेळी करण्याच्या मार्लन सॅम्युअलच्या विश्वविक्रमाची केन विलियम्सनने बरोबरी केली आहे. मार्लन सॅम्युअलने २०१६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लडविरुद्ध ८५ धावांची केली होती.
या यादीत दुसऱ्या स्थानी देखील मार्लन सॅम्युअल आहे. त्याने २०१२ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ७८ धावांची खेळी खेळली होती. तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आहे. त्याने २०१४ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ७७ धावांची खेळी खेळली होती. तर चौथ्या स्थानी भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आहे. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध ७५ धावांची खेळी खेळली होती.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात ४ गडी गमावून १७२ धावा केल्या. संघाकडून कर्णधार केन विलियम्सनने ४८ चेंडूत ८५ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय मार्टिन गप्टिलने २८ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने जबरदस्त गोलंदाजी करताना ४ षटकात १६ धावा देत ३ बळी घेतले. लेगस्पिनर ऍडम झम्पाने २६ धावांत एक विकेट घेतली. या सामन्यात मिशेल स्टार्क चांगलाच महागडा ठरला. त्याने चार षटकांत ६० धावा दिल्या.
यानंतर १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि डेविड वॉर्नरने अर्धशतके करताना ९२ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ विकेट्स गमावत १७३ धावांचे आव्हान पार केले. मार्शनं नाबाद ७७ धावा केल्या. तर वॉर्नरने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘देशाला अभिमान वाटावा यासाठी परिश्रम करत राहील’, अर्जुन पुरस्कार मिळाल्यानंतर शिखर धवन झाला व्यक्त
बऱ्याच काळापासून कसोटी संघातून बाहेर असलेल्या ‘या’ ४ खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्ध द्रविड देऊ शकतो संधी
हसन अलीची सेमीफायनलमधील चुकीबद्दल दिलगिरी; म्हणाला, ‘माझ्यावर खूप निराश होऊ नका…’