राजकोट । भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंड नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मालिकेत भारत १-० असा आघाडीवर आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. आशिष नेहराच्या जागी मोहम्मद सिराज या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यात आजपर्यंत ६ सामने झाले असून त्यातील ५ सामने न्यूजीलँड संघ जिंकला आहे. आजपर्यंत झालेल्या ६ पैकी ६ सामन्यात एमएस धोनी खेळला आहे.
मोहम्मद सिराज या खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० खेळणारा ७१वा खेळाडू ठरला आहे.
भारत आज विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहे.
आज सिराजला टी२० कॅप प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. यावेळी ह्या खेळाडूला आपला आनंद आणि हास्य लपवता आले नाही. यापूर्वी भारताकडून टी२०मध्ये दिल्ली सामन्यात श्रेयस अय्यरने पदार्पण केले होते.
भारतीय संघ:
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह