आयपीएल २०२१ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आगामी इंग्लंड दौरा साठी सज्ज झाला आहे. भारत इंग्लंडमध्ये सर्वप्रथम न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर, भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष रिषभ पंतवर असेल. या दौऱ्यात पंतला यशस्वी होण्याचा कानमंत्र भारताच्या दिग्गज क्रिकेटपटू दिला आहे.
विश्वविजेत्या कर्णधाराने दिला गुरुमंत्र
ऑस्ट्रेलिया दौरा, इंग्लंड विरुद्धची मालिका व आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर रिषभ पंतने इंग्लंडमध्ये देखील चमकदार कामगिरी करावी, अशी सर्वांची अपेक्षा असेल. त्याची कामगिरी इंगलंड दौऱ्यावर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील भारतीय संघासाठी निर्णायक भूमिका बजावू शकते. याचसाठी भारताला इंग्लंडमध्येच १९८३ साली विश्वचषक विजय मिळवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी पंतला इंग्लंडच्या भूमीवर यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला आहे.
एका प्रमुख वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल देव यांनी म्हटले, “रिषभने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करावी अशी माझी खूप इच्छा आहे. तो आता अधिक परिपक्व दिसतोय. तो मोठे फटके मारू शकतो. मात्र, मी त्याला सांगू इच्छित आहे की, त्याने प्रत्येक चेंडूवर बॅट फिरवू नये. त्याने खेळपट्टीवर अधिक वेळ घालवला तर तो चांगले प्रदर्शन करू शकतो. रोहित शर्मा सुरुवातीला आला होता तेव्हा असाच होता. त्याने आपल्या खेळात सुधारणा केली व तो सध्या काय आहे हे आपण जाणतो.”
रिषभ पंत याने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सिडनी व ब्रिस्बेन कसोटीत अप्रतिम खेळी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ही त्याची बॅट तळपलेली. तर, आयपीएल २०२१ मध्ये त्याच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सने हंगाम स्थगित होईपर्यंत अव्वलस्थान काबीज केलेले.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा
आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत बांग्लादेशी खेळाडूंची मोठी झेप, यांना टाकले मागे
चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! या सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक