२५ जून १९८३ रोजी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विंडीजविरुद्ध ट्रॉफी जिंकून जगाला चकित केले. प्रवासाच्या आशेने तो विश्वचषक खेळण्यासाठी इंग्लंडला गेल्याचे अनेक खेळाडूंनी मान्य केले होते. पण संघाचा कर्णधार कपिल देवच्या हार न मानण्याच्या भावनेने भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेच भारताचे माजी आणि १९८३च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट पाहुन भावुक झाले.
भारताचे माजी आणि १९८३च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव हे ३९ वर्षाच्या कालावधीनंतर १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट एक प्रशंसक राजेश गुप्ताच्या हातात पाहुन भावुक झाले. ते म्हणाले की,’ हे खुप अमुल्य आहे. याला सांभाळुन ठेवा.’ दिल्लीच्या राहणाऱ्या या राजेश गुप्ताकडे १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट आहे. ते त्याने कपिल देव यांना दाखवले आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी देखील घेतली.
राजेश त्यावेळी दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे कर्णधार होते. ते वेगवान गोलंदाज सुनील वाल्सन आणि अष्टपैलु खेळाडू कीर्ति आझाद यांना ओळखत होते जे १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे सदस्य होते. तसेच त्यांचे काही मित्र लंडनमध्ये ही होते. २२ वर्षाचे ते जेव्हा स्टेडियम बाहेर पोहोचले तेव्हा तिथे फार गर्दी होती आणि सुरक्षा पण खुप कडक होती. त्यांनी इकडे तिकडे नजर फिरवली तर त्यांना कळाले की काही स्थानिक लोक तिकीट विकत होते. आणि म्हणुन त्यांनी त्यावेळी १० पौंडचे तिकीट ९० पौंडला विकत घेतले. त्यांनी त्यावेळी ३ तिकीट खरेदी केली होती. कारण तेव्हा त्याच्यांसोबत ३ अजुन दोन व्यक्ती होते.
राजेश त्यावेळी म्हणाले की, मी खुप खुश होतो की मला अंतिम सामन्याचे तिकीट मिळीले होते ज्या सामन्यामध्ये इतिहास घडणार होता. आणि जेव्हा मदनलाल च्या चेंडूवर कपिल देव विवियन रिचर्डसचा झेल घेण्यासाठी धावले तेव्हा ते त्याच दिशेला २० पाऊलांवर बसलेले होते. तसेच रात्रभर विजयाचा आनंद साजरा केल्यानंतर त्यांना तिकीटांची आठवण झाली तेव्हा त्यांना दोनच तिकीट मिळाले. एक तिकीट मात्र त्यांना भेटले नाही. आणि त्याच २ तिकीटांना त्याने आजवर म्हणजेच ३९ वर्ष सांभाळुन ठेवले आहे.
दरम्यान, राजेश गुप्ताच्या मुलाची म्हणजेच अर्जुन गुप्ताची कपिल देव यांच्या मॅनेजरशी चांगली ओळख आहे. जेव्हा अर्जुनने त्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा लगेचच देव यांनी राजेश गुप्ताला भेटण्यासाठी बोलावणे धाडले. आणि त्याचवेळी ते तिकीट पाहुन ते भावुक झाले. आणि त्यावर आपले स्वाक्षर ही केले. अर्जुन स्वत: एक क्रिकेटर राहिला आहे. मात्र तो आतो क्रिकबज या संकेतस्थळाचा मालक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणजी ट्रॉफी: अंतिम सामन्यात चौथ्या दिवशीही मध्य प्रदेश पडतोयं मुंबईवर भारी!
VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार
मितालीविनाही भारतीय संघ करतोय ‘राज’, दुसरी टी२० जिंकत मालिका नावावर





