वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला जात आहे. यजमान भारत व ऑस्ट्रेलिया या सामन्यात समोरासमोर आले आहेत. या सामन्यात विश्वविजेत्या माजी कर्णधारांना सन्मानित केले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
आयसीसी व बीसीसीआय या सामन्यादरम्यान यापूर्वी विश्वचषक जिंकलेल्या सर्व कर्णधारांना सन्मानित करणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, 1983 मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव हे एका वृत्तवाहिनीवर समीक्षक म्हणून बसलेले दिसले. त्या कार्यक्रमात त्यांना याबाबत विचारले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
Kapil Dev Not invited to World Cup Finals#KapilDev #IndiaVsAustralia #WorldcupFinal #IndiaVsAustraliaWC2023 #WC2023 pic.twitter.com/zLRDB8ASdd
— Veer Wolf (@wolfbaaz) November 19, 2023
“तुम्ही लोकांनी मला येथे बोलावले मी आलो. त्यांनी मला कोणतेही आमंत्रण दिले नाही म्हणून मी गेलो नाही. मला वाटत होते की आमचा संपूर्ण संघ तिथे असावा. मात्र, असे झाले नाही. तिथे लोकांना खूप कामे आहेत कदाचित आमंत्रण द्यायचे राहून गेले असेल.”
या संपूर्ण खुलासामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
(Kapil Dev Explosive Reveal On Not Invited In ODI World Cup Final)
हेही वाचा-
World Cup Final: आक्रमक सुरुवातीनंतर रोहित अन् श्रेयस लागोपाठ तंबूत, विराट मैदानात उभा
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का