आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक आश्चर्यकारक रेकाॅर्ड खेळाडूंच्या नावावर असतात. तसंच असा एक भारतीय क्रिकेटर आहे, जो त्याच्या 16 वर्षांच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत कधीही धावबाद झाला नाही. धावा चोरताना फलंदाज अनेकदा धावबाद होण्याची चूक करतात, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण संघाला अनेक वेळा पराभवाचा सामना करावा लागतो. एखाद्या फलंदाजावर विजयाची जबाबदारी असताना तो धावबाद झाला तर तो त्याच्याच संघाचा सर्वात मोठा शत्रू बनतो.
एक भारतीय क्रिकेटर असा आहे, जो त्याच्या कारकीर्दीत कधीही धावबाद झाला नाही. भारताला 1983चा पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव (Kapil Dev) त्याच्या 16 वर्षांच्या संपूर्ण क्रिकेट कारकीर्दीत कधीही धावबाद झाला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 687 विकेट्स घेण्याचा रेकाॅर्ड माजी भारतीय कपिल देवच्या नावावर आहे. कपिल देवनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 9,031 धावा केल्या आहेत.
कपिल देवच्या (Kapil Dev) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 1978 साली भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 1994 साली त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. कपिल देवनं भारतासाठी 131 कसोटी आणि 225 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं अनुक्रमे 5,248 आणि 3,783 धावा केल्या आहेत.
225 एकदिवसीय आणि 131 कसोटी आंतरराष्ट्रीय सामन्यात अनुक्रमे 253 आणि 434 विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव (Kapil Dev) जगातील सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी आहे. 1983च्या विश्वचषकात कपिल देवनं झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची तुफानी खेळी खेळली होती. संघाला कठीण परिस्थितीतून काढून त्यानं भारताला पहिलाच विश्वचषक जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
Paris Paralympics 2024: चाैथ्या दिवशी भारताच्या झोळीत येऊ शकतात आणखी 4 पदकं, पाहा वेळापत्रक
दमदार कामगिरीसह रूटच्या निशान्यावर सचिनचा ‘वर्ल्ड रेकाॅर्ड’
5 भारतीय खेळाडू जे आयपीएलमध्ये फक्त एकाच संघासाठी खेळले