सध्याच्या क्रिकेट विश्वात खेळाडू सर्वाधिक भर त्यांच्या फिटनेसवर देतात. त्यासाठी प्रत्येक खेळाडूंचे वेगवेगळे रुटीन, नियोजन असते. भारतीय संघाला पहिला वहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनीही त्यांच्या फिटनेसचे रहस्य उलगडले असून युवा खेळाडूंना फिटनेसचा कानमंत्रही दिला आहे. माजी अष्टपैलूने युवा खेळाडूंना फिटनेसच्या काही टिप्स दिल्या आहेत. त्यांनी युवा खेळाडूंना आपल्या शरीरयष्टीच्या हिशोबाने सराव केला पाहिजे. तसेच त्यांनी पुढे ते जेव्हा क्रिकेट खेळत होते तेव्हा ते स्वत:ला कसे फिट ठेवत होते हे पण सांगितले आहे.
कपिल देव (Kapil Dev) यांनी म्हटले, “युवा खेळाडूंनी स्वत:ला तंदुरूस्त ठेवत, देशालाही तंदुरूस्त बनवले पाहिजे. तब्येत ठिक असली तर जीवन चांगले होईल आणि जीवन चांगले असेल तर देशाचा, संघाचा यात फायदा आहे. फिट राहण्यासाठी एक प्रकारची रूटीन असते. तसेच फिटनेससाठीही एक रूटीन असते.”
“तुम्ही तुमच्या शरीरयष्टीला ओळखा. दुसरे आपल्या फिटनेससाठी काय करतात याकडे लक्ष न देता, आपल्या शरीरयष्टीला काय पाहिजे याकडे लक्ष द्या. काही जण १० किमी पळतात, तर काही जण २ किमी पळतात. यामुळे प्रत्येकाची शरीरयष्टी वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याप्रकारे आपण मेहनत घेतली पाहिजे,” बजाज एलियांस लाईफ इंश्योरेंसने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान कपिल देव बोलत होते.
या कार्यक्रमामध्ये १९८३ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे कर्णधार कपिल यांनी ते जेव्हा खेळत होते तेव्हा त्यांनी आपल्या फिटनेससाठी काय केले हे पण सांगितले आहे. ते म्हणाले, “मी खेळत होतो तेव्हा फिट राहण्यासाठी मी काही खूप मोठे नियोजन करत नव्हतो. कारण तेव्हाची सिस्टीम वेगळ्या प्रकारची होती. तेव्हा सगळे संघ सोबतच सराव करत असत. तेव्हा आम्हा स्वत:लाच माहित नव्हते की फिटनेसाठी कशाला अधिक प्राधान्य द्यावे ते.”
आजच्या घडीला संघामध्ये जागा मिळवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) करारबद्ध खेळाडूंना यो-यो टेस्ट द्यावी लागते. ही टेस्ट मोठ्या मालिका खेळण्याआधी घेण्यात येते. त्यात तुम्ही पास झाला तरच तुमची संघात जागा पक्की होते. फिटनेसमध्ये कमीपणा असला की त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चिन्नाथालासाठी आयुष्य खर्ची केरणारा ‘सुपर फॅन’ हरपला! रैनाने व्यक्त केले दुःख
पळताना स्पर्धकाची चड्डी घसरली आणि त्याचे मेडलचे स्वप्न भंगले