टी20 विश्वचषकाच्या (2022 T20 World Cup) सुरुवातीनंतर पहिल्या फेरीच्या सामन्यांमध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागले. असे असले तरी सर्व चाहत्यांना 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामन्याची प्रतीक्षा आहे. क्रिकेटविश्वातील हे दोन्ही मातब्बर संघ ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड अर्थात एमसीजी (MCG) आमने-सामने येतील. भारतीय संघ या विश्वचषकात विजेतेपदाचा दावेदार म्हणून सहभागी झाला आहे. असे असले तरी भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांना भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता कमी वाटत आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार असलेले कपिल देव नुकतेच लखनऊ येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांना विश्वचषकातील भारतीय संघाच्या आव्हानाविषयी विचारले गेले. तेव्हा ते म्हणाले,
“टी20 हा क्रिकेटचा असा प्रकार आहे ज्यामध्ये तुम्ही एक सामना जिंकला तरी पुढील सामना गमावू शकता. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, ते विश्वचषक जिंकतील का हे सांगणे खरंच कठीण आहे. मला तर संघाची उपांत्य फेरी पर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी वाटतेय. माझ्यामते भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत जाण्याची शक्यता केवळ 30 टक्के आहे.”
भारतीय संघ या विश्वचषकात ब गटामध्ये सामील आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे संघ सामील आहेत. तसेच पात्रता फेरीतून आणखी दोन संघ या गटात सामील होतील. त्यामध्ये भारतीय संघाला श्रीलंकेचेही आव्हान मिळण्याची शक्यता वाढली आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
माजी प्रशिक्षकांनी गायले मोहम्मद शमीचे गुणगाण; म्हणाले ‘शाहीन आफ्रिदीपेक्षा…’
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना? एका क्लीकवर मिळवा सगळी माहिती