---Advertisement---

‘आऊट ऑफ फॉर्म’ असलेल्या विराटला कपिल पाजींचा मोलाचा सल्ला, म्हणाले ‘मित्रा, आता तू हे करच…’

On: शुक्रवार, जुलै 15, 2022 1:11 PM
Virat-Kohli-Kapil-Dev
---Advertisement---

विराटच्या फॉर्मविषयी सगळेच चिंतेत आले आहे. मागील काही काळापासून त्याच्या बॅटमधून एकही शतक किंवा अशी मोठी खेळी बाहेर पडली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच नाही तर नुकत्याच झालेल्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) हंगामामध्येही अशीच परिस्थिती होती. आहे. यामुळे त्याच्यावर आजीमाजी खेळाडूंनी त्याबद्दल टीकाही केली आहे. तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. 

विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून वाईट फॉर्ममधून जात आहे. तरीही तो संघात असल्याने अनेक आजीमाजी खेळाडूंनी त्याबद्दल टीकाही केली आहे. तर काहींनी त्याला सल्लाही दिला आहे. भारताचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव (Kapil Dev) हे पण याबाबतीत मागे राहिले नाही. त्यांनी विराटला विश्रांती घेण्याचे सुचविले आहे. माध्यामांतील वृत्तानुसार, कपिल देव आणि विरेंद्र सेहवाग यांनी त्याला जर संघातून वगळले नाही तर त्याला अंतिम अकरामध्ये घेऊ नका, असे विधान केले होते. दिग्गजांनी केलेल्या या टीकांवर सुनील गावसकर, आशीष नेहरा आणि सौरव गांगुली यांनी त्याची पाठराखण केली आहे.

“विराटला संघातून वगळणे ही काही वाईट बाब नाही. त्याच्यामध्ये अजून क्रिकेट बाकी आहे. मात्र त्याला स्वत:ला मेहनत करणे आवश्यक आहे. तो जर आउट ऑफ फॉर्म आहे तर त्याला संघातून वगळणे चुकीचे नाही. मात्र यादरम्यान त्याला लयीत परत कसे आणले पाहिजे यावर योग्य तो निर्णय घ्यावा,” असे कपिल यांनी म्हटले आहे.

कपिल यांनी विराटच्या विषयी धक्कादायक विधान केले असले तरी त्यांनी त्याला टी२० विश्वचषकात खेळावे, अशी इच्छाही दर्शवली आहे. या स्पर्धेत त्याला खेळण्यासाठी लयीत परतावे लागेल. त्यासाठी त्याला आराम नाही तर क्रिकेट खेळावे लागेल.

“विराट हा ३४ वर्षांचा असून तो विश्रांतीची मागणी करतो हे पटण्यासारखे नाही. जर त्याला आरामच हवा असेल तर त्याने आयपीएल नाही खेळले पाहिजे,” असेही कपिल यांनी पुढे म्हटले आहे. त्यांच्याप्रमाणे सेहवागनेही विराटच्या संघात असण्यावर आक्षेप घेतला होता.

गुरूवारी (१४ जुलै) बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टी२०चा संघ जाहीर केला आहे. यामध्ये विराट आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली गेली आहे.

कपिल आणि सेहवागच्या विधानांवर बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी’ विराटची आकडेवारी पाहा, त्याच्यामध्ये गुणवत्ता असून त्याने ती सिद्धही केली आहे’, असे प्रत्युत्तर दिले आहे. तसेच त्यांनी हे पण मान्य केले की त्याला थोडी विश्रांती घेणे जरूरी आहे. अशात त्याने बाहेरच्या आवाजांना दुर्लक्ष करावे, असा सल्लाही दिला आहे.

आयसीसी वनडे फलंदाजाच्या क्रमवारीत विराट तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके केली असून त्याच्या ७१व्या शतकाची वाट चाहते चातकासारखी पाहत आहेत.

विराटने १०२ कसोटीमध्ये ८०७४, २६० वनडेत १२३११ आणि ९९ टी२० सामन्यांत ३३०८ धावा केल्या आहेत. या तिन्ही प्रकारामध्ये त्याची सरासरी ५०च्या आसपास आहे. सध्या तो इंग्लंड दौऱ्यात वनडे मालिकेत खेळत आहे. तर त्याला आगामी वेस्ट इंडीजच्या टी२० आणि वनडे मालिकेमधून वगळले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार

महाराष्ट्राचे ‘बुवा’ कबड्डीसाठी आयुष्यभर झटले, त्यांच्या जन्मदिनी साजरा होतोय ‘कबड्डी दिवस’

आयसीसीची बांग्लादेशी खेळाडूवर मोठी कारवाई, छोट्याशा चुकीसाठी थेट १० महिन्यांसाठी केलं बॅन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---