---Advertisement---

गावसकरांनंतर कपिलचाही भारताच्या खेळाडूंवर निशाणा, पैशांचा उल्लेख करत म्हणाले…

On: रविवार, जुलै 30, 2023 6:29 PM
kapil Dev
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव यांनी एका मुलाखतीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर भाष्य केले आहे. कपिल देव यांच्या मते भारतीय संघासाठी सध्या खेळणाऱ्या खेळाडूंकडे सल्ला घेण्यासाठी सुनील गावसकर यांसारखे दिग्गज उपलब्ध आहेत. मात्र, खेळाडू सल्ला घेण्यासाठी पुढे येत नाहीत. तत्पूर्वी भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

भारतीय संघाचे युवा खेळाडूंना कुणाच्या संल्ल्याची गरज भासत नाही, याबाबत कपिल देव (Kapil dev) यांना चिंता वाटत असल्याचे दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल देव म्हणाले की, “भारताच्या खेळाडूंकडे जास्त पैसे आले आहेत आणि यामुळेच त्यांच्यात घमंड देखील आल आहे. त्यांना वाटत आम्हाला सगळ माहीत आहे. तुम्हच्याकडे सुनिल गावसकर सारखे माजी खेळाडू आहेत ज्यांना क्रिकेटचा 50 वर्षांहून अधिक अनुभव आहे. तुम्ही त्यांच्यासोबत या गोष्टी बोलू शकत नाही? तुमच्यामध्ये येवढा घमंड कोठून आला. जर तुम्ही तुमच्या गोष्टी त्यांना सांगीतल्या तर निश्चितपणे ते तुम्हाला मदत करतील. अनुभवी खेळाडूंच्या काही गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असतो.”

सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, वीवीएस लक्षमण सारखे खेळाडू माझ्याकडे येत असायचे. त्यांना काही समस्या असल्या की ते येवून भटायचे. त्यांना मी अनेक गोष्टी सांगायचो. माझा अनुभव त्यांच्या सोबत सतत सांगत असे. या गोष्टीमुळे माझ्यात कोणत्याही प्रकारचा घमंड नाही. खरतर मी स्वता जावून त्यांना या गोष्टी सांगू शकतो. पण आता राहुल द्रविड, विक्रम राठोड सारखे प्रशिक्षक संघात आहेत. आणि त्यांना मला गोंधळून टाकायचे नाही. भारतीय फलंदाज आमच्याकडून कोणताही सल्ला घेत नाही. त्यांना आता घमंड आले आहे.” याच वक्तव्यावर भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि सलामीवीर विरेंद्र सेहवाग यानेही युवा खेळाडूंच्या वर्तनाबाबत आक्षेप घेतला होता.

महत्वाच्या बातम्या:  
‘अँडरसन-ब्रॉडची जोडी नेहमी स्मरणात राहील’, द्रविडने सांगितले इंग्लिश दिग्गजाचे संघातील महत्व
मॅचविनर कॅप्टनने सांगितलं भारताविरुद्ध विजयाचं सर्वात मोठं कारण; म्हणाला, ‘या सामन्यात आम्ही खूप…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---