---Advertisement---

‘असे अनेक खेळाडू येतात आणि गायब होतात!’, कपिल देव यांनी उमरानबद्दल केले मोठे विधान

On: शनिवार, जून 11, 2022 12:57 PM
Umran-Malik-Kapil-Dev
---Advertisement---

सध्या संपूर्ण भारतभरात किंबहुना जगभरात एकाच वेगवान गोलंदाजाची चर्चा आहे, तो गोलंदाज म्हणजे उमरान मलिक. उमरानला लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी द्यावी अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते आणि दिग्गजांकडून करण्यात येत आहे. अशातच आता भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांनी उमरान बद्दल भाष्य केले आहे. 

कपिल देव म्हणाले की, “मी त्याच्या निवडीने खूप खूश आहे. पण त्याच्याबद्दल आताच काही सांगणे घाईचे ठरेल. किमान दोन-तीन वर्षे तरी त्याने प्रयत्न करायला हवेत. आपण एखाद्या खेळाडूकडे जास्त लक्ष देतो आणि मग तो वर्षभरानंतर गायब होतो, पण त्याच्यात टॅलेंटची कमतरता नसते. उमरानने योग्य वातावरणात राहावे आणि त्याच गतीने मेहनत करत राहावे अशी माझी इच्छा आहे. त्याची क्षमता पाहिल्यानंतर मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काही कमतरता आहे. त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य मानसिकता जपली पाहिजे.”

कपिल देव पुढे बोलताना म्हणाले की, “तो वेगवान गोलंदाजी करतो आणि विकेटही घेतो. आपण असे अनेक गोलंदाज पाहिले आहेत जे वेगाने चेंडू फेकतात मात्र, विकेट्स घेत नाहित. मात्र, या तरुण मुलाकडे दोन्ही गुण आहे. कदाचित त्यामुळेच त्याचा इतक्या लवकर संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना राष्ट्रीय संघात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान दोन-तीन वर्षे तरी त्याला पाहायला हवे. जर तुम्ही १५० पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असाल तर ९ पेक्षा जास्त वेगाची सरासरी चांगली गोष्ट नाही. उमरानला त्यावर काम करावे लागेल, यॉर्कर वापरून बघा आणि फलंदाजाची मानसिकता समजून घ्या. पण या सर्व गोष्टी वेळेनुसार तयार होतील. जेव्हा तो चांगल्या फलंदाजांना गोलंदाजी करतो तेव्हा तो सुधारेल आणि त्याची सरासरी खाली येईल.”

दरम्यान, उमरान मलिकने आयपीएल २०२२दाजाने १३.४० मध्ये हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या. जम्मू आणि काश्मीरच्या युवा वेगवान गोलं च्या स्ट्राइक रेटने ९.०३ च्या सरासरीने धावा देत विकेट्स घेतल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

निवृत्तीच्या ३ वर्षांनंतर युवराज भावुक, इंस्टाग्राम वर शेअर केला व्हिडिओ

दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?

बाबर आजमची चूक पाकिस्तानला भलतीच भोवली, विरोधी संघाला मिळाल्या तब्बल ‘एवढ्या’ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---