भारतात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मागील अनेक आठवड्यांपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या क्रिकेटपटूही त्यांच्या घरीच आहेत. या दरम्यान अनेक क्रिकेटपटूंनी स्वत:च घरी केस कापण्याचा पर्यायही स्विकारला आहे.
काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीने त्याची पत्नी अनुष्का शर्माने त्याचे केस कापतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही स्वत:च त्याचे केस कापले. आता भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार कपिल देव वेगळ्याच रुपात सर्वांसमोर आले आहे.
त्यांनी लॉकडाऊनच्या दरम्यान चक्क मेकओवर केला आहे. त्यांचा मेकओवर पाहुन अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कपिल यांनी टक्कल केला आहे. तसेच दाढी आणि मिशी ठेवली आहे. त्यांच्या या लूकचे फोटो त्यांचा जूना मित्र आणि संघसहकारी चेतन शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये दिसते की कपिल यांनी डोक्यावर चश्मा लावलेला आहे. तसेच काळ्यारंगाचा सुट घातला आहे. कपिल देव यांचे नव्या लूकमधील फोटो शेअर करताना चेतन शर्माने कॅप्शन दिले आहे की ‘दिग्गज कपिल देव यांचा नवीन लूक. मला आवडला. त्यांना वेगळ्या रुपात पाहून छान वाटले. मस्त’.
Legendary Kapil Dev's New Look. Wow.loved it, Great to see paji in different look.
Fantastic @therealkapildev pic.twitter.com/TCvl1Z6AHX— Chetan Sharma (@chetans1987) April 20, 2020
कपिल यांचा हा लूक अगदी कमी वेळातच सोशल माडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्यांच्या या लूकला विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींनी त्यांच्या या लूकची तूलना विव रिचर्ड्स यांच्याशीही केली आहे. तर काहींनी त्यांची कटप्पा, रजनीकांत, थानोस, असे अनेकांशी तुलना केली आहे.
भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनीही कपिल देव यांच्या नव्या लूकचे कौतुक केले आहे.
Love this look Paaji! Keep it!@therealkapildev pic.twitter.com/zWKZ4HVvrx
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 21, 2020
https://twitter.com/KingKhadoos/status/1252320894141292554
https://twitter.com/BillgatesBillu/status/1252279272326086656
Kapil dev or katappa mama ? ????
— Eeshaan Shanker (@eeshaan_shanker) April 21, 2020
ट्रेंडिंग घडामोडी –
रणजी ट्राॅफीत सचिनने घेतल्या फक्त २ विकेट, एक पुढे झाला भारताचा मुख्य गोलंदाज तर दुसरा
६० कसोटी सामने खेळूनही एकही मॅन ऑफ द मॅच नशीबात नसलेले क्रिकेटपटू
१० कसोटी सामने खेळूनही एकही वनडे खेळायला न मिळालेला दुर्देवी क्रिकेटपटू






