पुणे, दि.24 जुलै 2017ः नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) व रनबडिज् क्लब यांच्या तर्फे आयोजित तिसर्या एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत अनुज करकरे, तान्या मेरी, अशोक नाथ, कविता रेड्डी, दिपक जोशी, डॉ.अभिजीत भंडारी, वैशाली कस्तुरे या खेळाडूंनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पुण्यातील रनबडिज् क्लब यांच्या तर्फे आयोजित ही स्पर्धा 10कि.मी आणि 21 कि.मी. या प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकुण 2500 धावपटूंसह अंध विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत मिटकॉन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट येथुन शर्यतीस प्रारंभ झाला असून रक्षक चौकाच्या दिशेने पुन्हा फिरून मिटकॉन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता. तसेच, याशिवाय जागृती शाळेच्या 20 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
21 किलोमीटर खुल्या गटात अनुज करकरे याने 1.37.44सेकंद वेळ नोंदवत पहिला क‘मांक पटकावला. तर, सुरज कल्याणकर व विजय गायकवाड यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. याच मुलींच्या गटात पुण्याच्या तान्या मेरीने 1.48.28सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. 10 किलोमीटर खुल्या गटात मुलांच्या गटात दिपक जोशीने 44.22सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक मिळवला. मुलींच्या वरिष्ठ गटात वैशाली कस्तुरेने 47.08 सेकंद वेळ नोंदवून विजय मिळवला. 21 किलोमीटर वरिष्ठ मुलींच्या गटात पुण्याच्या कविता रेड्डीने 1.43.12सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना पदक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण एनआयओचे संचालक आणि पुण्यातील प्रमुख नेत्रतज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, अरूणा केळकर, जाई केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन वेळचे एव्हरेस्टवीर आणि कॉमरेड फिनिशर किशोर धनकवडे, रनबडिज् क्लबचे निखिल शहा व अरविंद बिजवे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकालः
10कि.मीः खुला गटः मुलेः 1.दिपक जोशी(44.22से); 2.दिग्विजय सिंग भंडारी(44.26से); 3.राहुल (44.33से);
मुलीः 1.प्रज्ञा(56.30से); 2.तृप्ती गुप्ता(56.41से); 3.चैत्राली(56.44से);
वरिष्ठ गटः मुलेः 1.डॉ.अभिजीत भंडारी(48.28से); 2.हितेंद्र चौधरी(48.30से); 3.प्रशांत तिडके(49.07से);
मुलीः 1.वैशाली कस्तुरे(47.08से); 2.स्मिता कुलकर्णी(55.01से); 3.आरती मराठे(57.53से);
21कि.मीः खुला गटः मुलेः 1.अनुज करकरे(1.37.44से); 2.सुरज कल्याणकर(1.38.26से); 3. विजय गायकवाड(1.38.50से);
मुलीः1. तान्या मेरी(1.48.28से); 2.तन्मया करमरकर(1.58.12से); 3.दिप्ती के.( 2.02.20से);
वरिष्ठ गटः मुलेः1.अशोक नाथ(1.38.02से);2.आशिष पुणतांबेकर(1.39.28से); 3.मुथ्थुकृष्णन जयरामण(1.39.46से);
मुलीः 1.कविता रेड्डी(1.43.12से), 2.जिया छनी(1.47.32से), 3. दुर्गा शिल(2.03.43से).