पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या अंकिता रैना, कारमान कौर थंडी, स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक, स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैना हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत चीनच्या कै-लीन झाँगचा 6-0, 6-0असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना 53मिनिटे चालला. चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीने युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवाचा टायब्रेकमध्ये 7-6(9), 6-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
हा सामना 1तास 54मिनिटे चालला. स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने रशियाच्या मरिना मेलनिकोवाचा 3-6, 6-0, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना 1तास 45मिनीटे चालला. स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या रोमानियाच्या जॅकलिन अडीना क्रिस्टियनचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या अंकिता रैनाने कारमान कौर थंडीच्या साथीत रशियाच्या अमिना अंशबा व पोलंडच्या कनिया पॉला यांचा 6-3, 6-3असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी):
कारमान कौर थंडी(भारत)[4] वि.वि. व्हॅलेरिया स्राखोवा(युक्रेन)7-6(9), 6-2;
अंकिता रैना(भारत)(2)वि.वि. कै-लीन झाँग(चीन) 6-0, 6-0;
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि. मरिना मेलनिकोवा(रशिया) 3-6, 6-0, 6-3
इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)वि.वि. जॅकलिन अडीना क्रिस्टियन(रोमानिया)6-2, 6-2;
दुहेरी गट: उपांत्य फेरी:
अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत)वि.वि. अमिना अंशबा(रशिया)/कनिया पॉला(पोलंड)6-3, 6-3;
अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)वि.वि.शे