पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या कारमान कौर थंडी, जर्मनीच्या कॅथरीना गेरलेच, स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या चौथ्या मानांकित कारमान कौर थंडीने क्वालिफायर बल्जेरियाच्या अलेक्झांड्रा नेदिनोवाचा 4-6, 7-5, 7-5 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली.
हा सामना 3तास 3मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये अलेक्झांड्राने थंडीची पाचव्या गेममध्ये, तर सहाव्या गेममध्ये थंडीने अलेक्झांड्राची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-3अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर थंडीने केलेल्या चुकांचा फायदा घेत अलेक्झांड्राने नवव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-4असा आघाडी घेतली.
दुसऱ्या सेटमध्ये थंडीने आक्रमक खेळ करत अलेक्झांड्राची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली हा सेट 7-5असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये थंडीने वरचढ खेळ करत अलेक्झांड्राविरुद्ध हा सेट 7-5अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.
क्वालिफायर जर्मनीच्या कॅथरीना गेरलेच हिने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या रिया भाटियाचा 6-0, 6-3असा सहज पराभव केला. स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने जपानच्या जुनरी नामिगताचा टायब्रेकमध्ये 7-6(2), (6)6-7, 6-4असा पराभव करून आगेकूच केली.
दुहेरी गटात भारताच्या अंकिता रैना व कारमान कौर थंडी या जोडीने आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करत तैपेईच्या पी-ची ली व ऑस्ट्रेलियाच्या कायलाह मॅकफी यांचा 6-2, 6-4 असा पराभव करत दुहेरीच्या दुस-या फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचे उद्घाटन बीव्हीजीचे उपाध्यक्ष उमेश माने आणि एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे, आयोजन समिती सचिव अश्विन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
कारमान कौर थंडी(भारत)[4]वि.वि.अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)4-6, 7-5, 7-5;
कॅथरीना गेरलेच(जर्मनी)वि.वि.रिया भाटिया(भारत)6-0, 6-3;
इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)वि.वि.जुनरी नामिगता(जपान)7-6(2), (6)6-7, 6-4;
याशिना इक्तेरिना(रशिया) वि.वि. रिसा ओझाकी(जपान) 6-4, 6-2
मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया) वि.वि. मारिया मारफुतीना(रशिया) 6-2, 6-2
दुहेरी गट: पहिली फेरी:
अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत) वि. पी-ची ली(तैपेई)/कायलाह मॅकफी(ऑस्ट्रेलिया) 6-2, 6-4
ची-सु हुसू(तैपेई)/जिया-जिंग लू(चीन)वि.वि.स्नेहल माने(भारत)/हो चिंग वू(हाँगकाँग)6-2, 6-4;
जॅकलिन आदिना क्रिस्टियन/क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड) वि.वि. रेका-लुका जनी(हंगेरी)/व्हॅलेरिया स्ट्राखोवा(युक्रेन)[4] 6-4, 3-6, 10-3;
शेरॉन फिचमन(कॅनडा)/कॅटरजयना पीटर(पोलंड)वि.वि.डायना मर्सीकेविचा(लातविया)/इडन सिल्वा(ग्रेट ब्रिटन)6-3, 6-1;
कॅटी ड्यून(ग्रेट ब्रिटन)/सराह बेथ ग्रे(ग्रेट ब्रिटन) वि.वि कॅथरीना गेरलेच(जर्मनी)/एरिका वोगेलसंग(नेदरलँड) 6-4, 5-7, 10-3
अमिना अंशबा(रशिया)/पॉला कानिया(पोलंड)वि.वि. नताशा पल्हा(भारत)/रिशीका सुंकारा(भारत) 6-0, 6-2