संपूर्ण भारत देशात सध्या कोरोना या महामारीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. लोकांना वैद्यकीय साहित्याची कमतरता भासू लागली असून, अनेक दानशूर व्यक्ती व जनता एकमेकास मदत करत आहेत. यामध्ये क्रिकेटपटूंनी देखील हातभार लावला आहे. भारतीय तसेच विदेशी क्रिकेटपटूंनी या संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. यामध्ये आणखी एका भारतीय खेळाडूची भर पडली आहे.
या खेळाडूने केली पाच लक्ष रुपयाची मदत
भारतीय संघाचा फिरकीपटू व सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य असलेला कर्ण शर्मा याने पाच लक्ष रुपयांची मदत कोरोना विरुद्धच्या संकटसमयी केली. त्याने ही मदत भारताचा माजी सलामीवीर व विद्यमान खासदार गौतम गंभीर याच्या गौतम गंभीर फाऊंडेशनला दिली. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला कर्ण देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेचे प्रतिनिधित्व करतो.
मदतीनंतर दिली अशी प्रतिक्रिया
ही मदत गौतम गंभीर फाउंडेशनकडे सुपूर्द करताना तो म्हणाला, “या कठीण प्रसंगी प्रत्येकांनी थोडा थोडा हातभार लावला तर आपण या संकटाचा सामना करू शकतो. याच भावनेतून मी या क्षेत्रात कार्य करत असलेल्या गौतम गंभीर फाउंडेशनसाठी हा निधी दिला.”
कर्णने अर्ध्यातून स्थगित झालेल्या आयपीएल विषयी बोलताना म्हटले, “स्पर्धेदरम्यान अचानकपणे कोरोनाची प्रकरणे समोर आली. खेळाडूदेखील या आजाराच्या विळख्यात सापडले. त्यानंतर सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊनच स्पर्धा थांबवली गेली.”
Many thanks @sharmakarn03 for your contribution to the COVID fight. This will go a long way in serving those in need. #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 12, 2021
अशी आहे कर्णची कारकीर्द
सध्या ३३ वर्षाचा असलेला लेगस्पिनर कर्ण शर्माने भारतीय संघासाठी एक कसोटी, दोन वनडे व एक टी२० सामना खेळला आहे. कर्ण विदर्भ संघासह रणजी चॅम्पियन देखील राहिला आहे. कर्णने आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले आहे. तो सलग तीन वर्ष तीन विविध संघांकडून आयपीएल विजेता बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘असे’ झाले तर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल? वाचा सविस्तर
“मोठ्या दुःखाने सांगावे लागत आहे की…”, आरपी सिंगने वडीलांच्या निधनानंतर लिहिला भावूक संदेश






