२०१८मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. तेव्हा कर्णधार एमएस धोनीने हरभजन सिंग सारख्या अनुभवी खेळाडूच्या जागी कर्ण शर्मा या खेळाडूला संधी दिली होती. वानखेडेवर असलेला हरभजनचा मोठा अनुवभ माहित असुनही धोनीने कर्णला संधी दिली होती.
या सामन्यात त्याने ३ षटकांत २५ धावा देत १ विकेट घेतली आणि ती विकेट होती या संपुर्ण स्पर्धेत ७०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या केन विलीयमसनची.
३० वर्षीय कर्ण शर्मा आयपीएलमध्ये २००९ पासुन खेळत आहे. त्यात तो बेंगलोर, हैद्राबाद, चेन्नई आणि मुंबई संघांचा भाग राहिला आहे.
२०१६मध्ये तो सनरायझर्स हैद्राबादमध्ये खेळत होता. त्याला अंतिम सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्याला त्या स्पर्धेत ५ सामन्यात एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला मुंबई इंडियन्सने संघात घेतले.
२०१७मध्ये मुंबईकडून खेळताना त्याला अंतिम सामन्यात स्थान देण्यात आले होते. २०१७ हंगामात ९ सामन्यात मुंबईकडून खेळताना त्याने १३ विकेट्स घेतल्या होत्या. अंतिम सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी करताना ४ षटकांत केवळ १८ धावा दिल्या. याच सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने केवळ १२९ धावा केल्या होत्या. त्यामुळे कर्णच्या गोलंदाजीत दिलेल्या कमी धावाही महत्त्वाच्या ठरल्या.
२०१६मध्ये तो विजेत्या हैद्राबाद संघाचा सदस्य होता तर २०१७मध्ये तो विजेत्या मुंबई संघाचा सदस्य होता. २०१८मध्ये आयपीएल विजेत्या चेन्नई संघाकडून त्याने धुरा वाहिली.
कर्ण शर्माची आयपीएल विजेत्या संघाकडून कामगिरी-
२०१६- सनरायझर्स हैद्राबाद- ५ सामन्यात ० विकेट
२०१७- मुंबई इंडियन्स- ९ सामन्यात १३ विकेट
२०१८- चेन्नई सुपरकिंग्ज- ६ सामन्यात ४ विकेट