यंदाच्या आयपीएल हंगामातील 50वा सामना चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) संघात खेळला गेला. दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आमने-सामने होते. या सामन्यात कर्ण शर्मा (Karn Sharma) आणि ट्रेंट बोल्ट (Trent Boult) यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये सलग सहावा विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला 100 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांसह सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या नाबाद 48-48 धावांच्या जोरावर 217/2 धावांचा मोठा आकडा उभारला. त्यानंतर एमआयच्या गोलंदाजांनी 16.1 षटकात फक्त 117 धावांवर गुंडाळले. शिवाय 2012 नंतर जयपूरमध्ये त्यांचा पहिला विजय नोंदवला.
मुंबई इंडियन्सच्या विजयात कर्ण शर्माने (Karn Sharma) मोलाची कामगिरी केली. त्याने 4 षटकात 23 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. ज्यामुळे मुंबईला सहज विजय मिळवणे अधिक सोपे झाले.
Deepak Chahar sprints, dives, and delivers 👊
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2025
Karn Sharma gets his 3rd wicket of the night 💙
Updates ▶ https://t.co/t4j49gXHDu#TATAIPL | #RRvMI | @mipaltan pic.twitter.com/9kaHuBRp3J
कर्ण शर्माने 12व्या षटकात 2 विकेट्स घेत आरआरचे कंबरडे मोडले तर बोल्टने जोफ्रा आर्चरला (30 धावा) शॉर्ट फाईन लेगवर झेलबाद करून डाव संपवला. या विजयाने एमआयची स्थिती आणखी मजबूत केली.