Bengaluru Deputy CM welcome to Virat Kohli: आयपीएलच्या इतिहासात 18 वर्षांनंतर राॅयल चॅलैंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत ट्राॅफीवर आपले नाव कोरले. आता आयपीएलवर बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर हजारो चाहते उपस्थित आहेत. यादरम्यान आरसीबी संघ विमानतळावर पोहोचताच उपमुख्यमंत्र्यांनी विराट कोहलीचे जोरदार स्वागत केले. (The Deputy Chief Minister gave a warm welcome to Virat Kohli)
KARNATAKA DEPUTY CM RECEIVING RCB PLAYERS. ????pic.twitter.com/X4eVCaGeWf
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 4, 2025
बंगळुरूच्या चाहत्यांना संघासोबत पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करायचा आहे. सर्वांना विराटसह संघातील सर्व खेळाडूंची एक झलक पहायची आहे. यासोबतच, चाहते आज (4 जून) संध्याकाळची वाट पाहत आहेत. यासाठी, आरसीबीचे चाहते मोठ्या संख्येने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पोहोचत आहेत, जिथे विजयी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. स्टेडियमच्या बाहेर लोक आरसीबी-आरसीबीचा जयघोष करत आहेत.
MASSIVE CROWD OUTSIDE CHINNASWAMY STADIUM…!!! ???????? pic.twitter.com/hK7Hpbcmi8
— Johns. (@CricCrazyJohns) June 4, 2025





