44 व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत स्वदेश मोंडल, धनुष एस, केनिशा गुप्ता, तनिश मॅथ्युयांना विक्रमासह सुवर्णपदक
पुणे, 3 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता, पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडल, तामिळनाडूच्या धनुष एस व कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु यांनी विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 200मी फ्रीस्टाईल प्रकारात महिला गटात महाराष्ट्राच्या रेना सलडानाने 2.11.02सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या अॅनी जैनने रौप्य पदक पटकावले तर कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व महाराष्ट्रच्या साध्वी धुरी यांनी 2.14.09सेकंदासह संयुक्तरीत्या कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या खुशी दिनेशने 2.12.83सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक संपादन केले. आसामच्या आस्था चौधरी व महाराष्ट्राच्या आकांक्षा शहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
200मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17वयोगटात तामिळनाडूच्या धनुष एस याने 2015 सालचा कर्नाटकच्या लिखित एस.पी याचा 2.24.15सेकंदाचा विक्रम मोडीत काढत 2.22.44सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. तर आंध्र प्रदेशच्या लोहित एम व एसएससीबीच्या मंगल सना एम यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळवले.
200मी प्रकारात मुलांच्या 13-14 वयोगटात पश्चिम बंगालच्या स्वदेश मोंडलने 2.28.87सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. स्वदाशने 2012 सालचा कर्नाटकच्या लिखित एस.पी याचा 2.29.48सेकंदाचा विक्रम मोडीत काढला. आसामच्या भार्गव फुकन व कर्नाटकच्या लितिश गौडाने रौप्य व कांस्य पदक संपादन केले.
200मी ब्रेसस्ट्रोक प्रकारात महिलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या सलोनी दलालने 2.43.01सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. सलोनीने तामिळनाडूच्या एम राघवीचा 2011 सालचा 2.46.96सेकंदाचा विक्रम मोडला. कर्नाटकच्या हर्षीता जयाराम व गुजरातच्या कल्याणी सक्सेना यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ताने 2.51.94सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. केनिशाने 2015चा कर्नाटकच्य सलोनी दलालचा 2.52.29सेकंदाचा विक्रम मोडला. तर एसएफआयच्या आदिती बालाजी व कर्नाटकच्या रचना एस.आर.राव यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने 26.90सेकांद वेळेसह विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. श्रीहरीने सकाळी झालेल्या प्रथमीक फरीत 26.96सेकंदाचा केलेला आपलाच विक्रम मोडीत काढला. गोवाच्या झेवीअर डीसुझा व पश्चिम बंगालच्या सौम्यजीत साहा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तन्मय दासने 28.93सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण पदक संपादन केले तर कर्नाटकच्या शिवांश सिंग व पंजाबच्या अक्षदिप सिंग यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी बॅकस्ट्रोक प्रकारात महिला गटात तामिळनाडूच्या जान्हवी आर हिने 31.75सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या जहंती राजेश व हरयाणाच्या खुशी जैन यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या 13-14 वयोगटात दिल्लीच्या तनिशा मालवीयाने 32.05सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. तर कर्नाटकच्या सुआना बस्कर व तेलंगणाच्या जान्हवी गोली यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.
50मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या 15-17 वयोगटात महाराष्ट्रच्या मिहिर आंब्रेने 25.88सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. मिहिर बालशिक्षण मंदिर येथे बारावी सायन्स शाखेत शिकत असून चॅम्पीयन्स येथे प्रशिक्षक विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर महाराष्ट्राच्या निल रॉय व तामिळनाडूच्या आदित्य डी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या 13-14 वयोगटात कर्नाटकच्या तनिश मॉथ्युने 26.68सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. तनिशने मध्य प्रदेशच्या हिमांशू ढाकरचा 2011 सालचा 26.86सेकंदाचा विक्रम मोडला.
50मी बटरफ्लाय प्रकारात महिलांच्या गटात महाराष्ट्रच्या आर्या राजगुरूने 29.56सेकंद वेळेसह सुवर्णपदक संपादन केले. मुलींच्या 13-14 वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने 30.17 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले.
स्पर्धेचे उद्धाटन भारतीय जलतरण महासंघाचे अध्यक्ष दिगंबर कामत, एएसआय कमांडंट राकेश यादव, ग्लेनमार्क फार्मासिटिकल्सचे सीएमडी ग्लेन सलडाना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी, आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल-
200मी फ्रीस्टाईल महिला(15-17 वयोगट)- 1. रेना सलडाना(महाराष्ट्र, 2.11.02से), 2. अॅनी जैन(मध्य प्रदेश, 2.14.05से), 3. मयुरी लिंगराज(कर्नाटक)/साध्वी धुरी(महाराष्ट्र)(2.14.09से)
200मी फ्रीस्टाईल मुली(13-14 वयोगट)- 1.खुशी दिनेश(कर्नाटक, 2.12.83से), 2.आस्था चौधरी(आसाम, 2.13.76से), 3.आकांक्षा शहा(महाराष्ट्र, 2.17.16से)
200मी ब्रेसस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1. धनुष एस(तामिळनाडू, 2.22.44से), 3.लोहित एम(आंध्र प्रदेश 2.26.26से), 3. मंगल सना एम(एसएससीबी, 2-19.00से)
200मी ब्रेसस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. स्वदेश मोंडल(पश्चिम बंगाल, 2.28.87से), 2. भार्गव फुकन(आसाम, 2.36.53से), 3. लितिश गैडा(कर्नाटक, 2.36.90से)
200मी ब्रेसस्ट्रोक महिला(15-17 वयोगट)- 1. सलोनी दलाल(कर्नाटक, 2.43.01से), 2. हर्षीता जयाराम(कर्नाटक, 2.49.09), 3.कल्याणी सक्सेना(गुजरात, 2.51.08से),
200मी ब्रेसस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 2.51.94से), 2. आदिती बालाजी(एसएफआय, 2.52.26से), 3. रचना एस.आर.राव(कर्नाटक, 2.52.93से)
50मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1.श्रीहरी नटराज(कर्नाटक, 26.90से), 2. झेवीअर डीसुझा(गोवा, 27.45से), 3. सौम्यजीत साहा(पश्चिम बंगाल, 28.42से)
50मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. तन्मय दास(दिल्ली, 28.93से), 2. शिवांश सिंग(कर्नाटक, 29.86से), 3.अक्षदिप सिंग(पंजाब, 30.11से)
50मी बॅकस्ट्रोक महिला(15-17 वयोगट)- 1. जान्हवी आर(तामिळनाडू, 31.75से), 2. जहंती राजेश(कर्नाटक, 32.37से), खुशी जौन(हरयाणा, 32.51से)
50मी बॅकस्ट्रोक मुली(13-14 वयोगट)- 1. तनिशा मालवीया(दिल्ली, 32.05से), 2. सुआना बस्कर(कर्नाटक, 32.31से), जान्हवी गोली(तेलंगणा, 32.33से)
50मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. मिहिर आंब्रे(महाराष्ट्र, 25.88से), 2. निल रॉय(महाराष्ट्र, 26.27से), 3. आदित्य डी(तामिळनाडू, 26.28से)
50मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. तनिश मॉथ्यु(कर्नाटक, 26.68से), 2. विकास पी(तामिळनाडू, 26.99से), 3. प्रसिध्द कृष्णा पी.ए(कर्नाटक, 27.60से)
50मी बटरफ्लाय महिला(15-17 वयोगट)- 1. आर्या राजगुरू(महाराष्ट्र, 29.56से), 2. मयुरी लिंगराज(कर्नाटक, 29.86से), 3.साध्वी धुरी(महाराष्ट्र, 29.93से)
50मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1. केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 30.17से), 2. लियाना उमेर(केरळ, 30.48से), 3. उत्तरा गोगाई(आसाम, 30.80से)
400मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)-1. खुशाग्रा रावत(दिल्ली, 4.07.75से), राहूल एम(कर्नाटक, 4.12.26से), 3. वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र, 4.17.09से)
400मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)-1. आर्यन नेहरा(गुजरात, 4.21.41से), 2. परम बिरथरे(मध्य प्रदेश, 4.22.91से), 3. लिओनार्ड व्ही(तामिळनाडू, 4.25.22)
800मी फ्रीस्टाईल महिला(15-17 वयोगट)-1. अभिशिक्ता पी.एम(तानिळनाडू, 9.36.15से), 2. रेना सलडाना(महाराष्ट्रा 9.36.35से), 3. प्राची टोकस(दिल्ली, 9.48.03से)
वॉटरपोलो मुले
पश्चिम बंगाल: 6(सौरभ सरदार 1, विशाल यादव 3, दिपांकर सरदार 1, सयान मोंडल 1) वि.वि दिल्ली:1(आर्यन सिंग दलाल 1)
महाराषट्र: 10(भागेश कुठे 4, भुषण पाटील 3, वैभव कुठे 1, विशाल महाजन 2) वि.वि मणिपुर: 2(एल. ऍलेक्स सिंग 1, एल. हिल्लार मांगंग 1)
केरळ: 10(सिबिन वर्गिस 6, मिधून ए.जे 1, संदिप डी.एस 1, अप्पू एन. एस 1, विष्ण आर 1) वि.वि पंजाब: 3(करमवीर सिंग 2, सुखदिप सिंग 1)
मुली- पश्चिम बंगालः 10(प्रियांका साधुखान 1, तमाली नास्कर 3, अनुश्री दास 2, क्रीशा पुदाकायास्थु 2, प्रतिमा नास्कर 1, जास्मिन खतून 1) वि.वि दिल्लीः 0
महाराष्ट्रः 13(साची शाह , राधीका कडू 1, रुचीका किराड 1, पायल घनकरी 1, महिमा मोसेस 7, अदिती वरूनका 1) वि.वि मणिपुरः 0