---Advertisement---

मयांक अग्रवालचे त्रिशतक, कर्नाटकने केला महाराष्ट्राविरुद्ध ६२८वर डाव घोषित

On: शुक्रवार, नोव्हेंबर 3, 2017 1:48 PM
---Advertisement---

गहुंजे, पुणे । येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक रणजी सामन्यात महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील २४५ धावांना प्रतित्तोर देताना कर्नाटकने दुसरा आज ५ बाद ६२८वर घोषित केला.

कर्नाटकचा सलामीवीर मयांक अग्रवालने ४९४ चेंडूत नाबाद ३०४ धावा करताना खणखणीत त्रिशतक केले. भारतीय क्रिकेटच्या प्रथम श्रेणी प्रकारातील ही ५०वी त्रिशतकी खेळी असून कर्नाटकडून केवळ करून नायर आणि केएल राहुल यांनी यापूर्वी त्रिशतकी खेळी केली आहे त्याचे शतक झाल्यावर कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने लगेच डाव घोषित केला.

कालच्या २ बाद ४६१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केलेल्या कर्नाटकच्या केवळ दोन विकेट्स घेण्यात महाराष्ट्राला यश मिळाले. आज करुण नायर जो काल ५६ धावांवर खेळत होता त्यानेही आज शतकी खेळी केली.

महाराष्ट्राकडून चिराग खुराणाने ३९ षटकांत १४७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

महाराष्ट्रापुढे डावाने पराभव टाळण्यासाठी ३७९ धावांची गरज असून सामन्याचा अजून दीड दिवस बाकी आहे.

संक्षिप्त धावफलक:
महाराष्ट्र पहिला डाव: सर्वबाद- २४५
कर्नाटक पहिला डाव: ५ बाद ६२८
आर समर्थ- १२९, मयांक अग्रवाल- ३०४*, करून नायर-११६, चिराग खुराणा- ३/१४७
महाराष्ट्र दुसरा डाव: ० बाद ०
स्वप्नील गुगळे खेळत आहे ०, हर्षद खडीवाले खेळत आहे ०

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment