इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सचा २ धावांनी पराभव केला. या रोमांचक सामन्यात १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ शेवटच्या चेंडूवर पराभूत झाला. विशेष गोष्ट म्हणजे कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी १२० धावा जोडल्या, पण कार्तिक त्यागीने शेवटच्या षटकात फक्त ४ धावाच होऊ दिल्या नाहीत.
कार्तिक त्यागीने पंजाबला डावाच्या शेवटच्या षटकात ४ धावांची आवश्यकता असतावा फक्त १ धाव देऊन राजस्थानला २ धावांनी नेत्रदीपक विजय मिळवून दिला. या अद्भुत विजयानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये शर्टलेस डान्स करताना दिसला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सामना संपल्यानंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जोरदार जल्लोष साजरा केला. राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात संघाचे खेळाडू आनंद साजरा करत आहेत.
या व्हिडिओ क्लिपमध्ये युवा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी आणि चेतन साकरिया शर्ट न घालता नाचताना दिसत आहेत. सलामीवीर यशस्वी जयस्वालही दोघांसोबत आनंद साजरा करताना दिसतोय. राजस्थानने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘थेट आनंदी ड्रेसिंग रूममधून.’
https://twitter.com/rajasthanroyals/status/1440586463851155459
सामनावीर म्हणून निवड झाल्यानंतर २० वर्षीय कार्तिक म्हणाला की, संघाच्या विजयात आपण योगदान देऊ शकलो याचा मला खूप आनंद आहे. तो म्हणाला, ‘मी नेहमीच ऐकत आलो आहे आणि या प्रकारामधील सामनेही पाहिले आहेत, जेथे अनेक विचित्र गोष्टी घडल्या आहेत. आज मला एका विशेष सामन्यात मोठी भूमिका साकारण्याचा बहुमान मिळाला आहे. मी सुरुवातीला शॉर्ट बॉल टाकत होतो, नंतर भरपूर सूचना मिळाल्यावर त्यावर काम केले. मला माहित होते की माझ्याकडे डेथ ओव्हरचे कौशल्य आहे.’
यशवी जयस्वाल (४९) आणि महिपाल लोमरोर (४३) यांच्या मदतीने राजस्थानने २० षटकांत १८५ धावा केल्या होत्या. अर्शदीप सिंगने ५ तर मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतल्या. यानंतर पंजाब संघ २० षटकांत ४ गडी गमावून १८३ धावा करू शकला. सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार अर्धशतक झळकावले, त्याने ६७ धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४९ धावा केल्या पण त्याचा संघ विजयापासून वंचित राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मँचेस्टर कसोटीप्रमाणे आयपीएलही रद्द होते का ते पाहू’, मायकेल वॉनची कोपरखळी
Video: अन् चालू सामन्यात अचानक मैदानात उतरले हेलिकॉप्टर, काही क्षणांसाठी खेळही थांबला
केकेआरविरुद्ध खेळणार का रोहित आणि हार्दिक? बोल्टने दिली महत्त्वपूर्ण माहिती






