आयपीएल २०२१ च्या ३६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सध्या तुफान फॉर्मात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सशी झाला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली संघाला चांगली सुरुवात करता आली नाही आणि संघाने दोन्ही सलामीवीरांच्या स्वस्तात विकेट लवकर गमावल्या. मात्र श्रेयस अय्यरची खेळी आणि गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे दिल्लीने ३३ धावांनी विजय मिळवला. मात्र राजस्थानचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने याही सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली.
त्याने पंजाब किंग्जविरुद्ध शेवटच्या षटकात ४ धावा वाचवल्या होत्या. दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही त्यागीने राजस्थानला सामन्याची अप्रतिम सुरुवात करून दिली. ऑरेंज कॅप धारक शिखर धवनला गोलंदाजी करून त्यागीने आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिली होती.
कार्तिक त्यागीच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर (३.१ षटक) धवन त्रिफळाचीत झाला. शिखर बॅकफूटवर असताना राजस्थानच्या युवा वेगवान गोलंदाजाचा आत येणारा चेंडू त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची आतील किनार घेऊन स्टंपला लागला. अशाप्रकारे दुर्देवीरित्या शिखर ८ चेंडूत ८ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
येथे पाहा व्हिडिओ-
https://www.iplt20.com/video/240029/m36-dc-vs-rr-shikhar-dhawan-wicket
शिखर बाद झाल्यावर शॉ देखील बाद झाला. त्याला चेतन साकारियाच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनकडे झेल देत माघारी धाडले. त्यानंतर पंत आणि श्रेयस यांनी संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने मोर्चा सांभाळत सर्वाधिक ४३ धावा केल्या. कर्णधार रिषभ पंतनेही काही आकर्षक फटके खेळत २४ धावा फटकावल्या. तर शेवटी शिमरॉन हेयमायरने षटकार-चौकारांची बरसात करत २८ धावा जोडल्या. संघातील आघाडीचे फलंदाज माघारी परतल्यानंतर ललित यादव (१४ धावा) आणि आर अश्विन (६ धावा) यांनी नाबाद राहत संघाची धावसंख्या १५४ धावांपर्यंत पोहोचवली.
दिल्लीच्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी पावरप्लेमध्येच लियाम लिविंगस्टोन (१ धाव), यशस्वी जयस्वाल (५ धावा) आणि डेविड मिलर (७ धावा) यांच्या विकेट गमावल्या. पुढे महिपाल लोमरोर १९ धावांचे योगदान देत कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर आवेश खानच्या हातून झेलबाद झाला.
पुढे कर्णधार संजू सॅमसनने मोर्चा सांभाळत डावाखेत ७० धावा चोपल्या. ५३ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. परंतु दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ २० षटकात १२१ धावाच करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
सॅमसन विकेटकिंपिग मोड ऑन! तडखाफडखी हात चालवत अय्यरला केले यष्टीचीत, फलंदाजही बुचकळ्यात
‘मास्टरमाइंड’ धोनीच्या ‘मास्टरप्लॅन’ पुढे कोहलीचा आरसीबी संघ फेल, कॅप्टनकूलची रणनिती अवश्य वाचा