आयपीएल २०२६ मध्ये शनिवारी (२५ एप्रिल) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना खेळला गेला. यामध्ये दिल्लीने मोठ्या धावसंख्या करूनही खराब क्षेत्ररक्षणामुळे सामना गमावला. त्यातला त्यात सर्वजण करुण नायरलाच दोष देत आहेत. त्याने अनेक सोपे झेल सोडले त्यामुळे संघाने सामना गमावला, मात्र आर अश्विनने त्याची पाठराखण केली आहे.
पीबीकेएसविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २६४ धावा केल्या होत्या. त्यामध्ये केएल राहुलने नाबाद १५२ धावा केल्या, मात्र हा सामना पीबीकेएसने सात चेंडू शिल्लक राखत असताना ऐतिहासिक लक्ष्य पूर्ण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना पीबीकेएसने आक्रमक सुरूवात केली होती. त्यांची फलंदाजी चांगलीच झाली, मात्र काही वेळा डीसी जिंकते असे वाटते होते. हा सामना दिल्लीने गोलंदाजी किंवा फलंदाजीने नाहीतर ढिसाळ क्षेत्ररक्षण करताना गमावला.
दिल्लीच्या प्रचंड गरम वातावरणात फलंदाजी करून राहुल थकला होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अनुपस्थितीत ट्रिस्टन स्टब्स विकेटकिपींग आला आणि हीच चूक डीसीला भोवली. स्टब्स हा डीसीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. तो अनेकदा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफवर क्षेत्ररक्षण करतो आणि त्याच ठिकाणेचे दोन सोपे झेल करुणने सोडले. ते दोन्ही झेल श्रेयस अय्यरचे होते. या सामन्यात करुण राहुलच्या जागी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आला होता.
राहुल याला जबाबदार कसा याबद्दल अश्विन म्हणाला, “राहुलने १५० धावा केल्या, त्याला डिहायड्रेशन झाले. त्यामुळे त्याने बाहेर बसण्याचा निर्णय घेतला. त्याच्याजागी ट्रिस्टन स्टब्स विकेटकिपींगला आला. याचा अर्थ डीसीचा विश्वासात्मक फिल्डर स्टब्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफवर उपलब्ध नव्हता. ही स्थिती बदली खेळाडूसाठी सोपी नसते.”
“करुण नायर मानसिकदृष्ट्या ‘स्विच ऑफ’ झाला होता-तसे पाहता हा शब्द कदाचित चुकीचा ठरेल, पण सरावामुळे त्याला कदाचित थकवा जाणवत असावा. मी काही कारणे सांगत नाहीये; पण एक पर्यायी खेळाडू म्हणून, सामन्याच्या तीव्र वातावरणात अचानकपणे मैदानात उतरताना, अशा गोष्टी घडू शकतात, असे अश्विन म्हणाला आहे.
“त्याने एक झेल सोडला आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास ढासळला. खरं तर, करुण हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे; प्रथम-श्रेणी आणि ‘रेड-बॉल’ क्रिकेटमध्ये, विशेषतः जवळच्या क्षेत्ररक्षण स्थितींमध्ये तो अत्यंत भरवशाचा असल्याचे मी पाहिले आहे. त्याने अशा प्रकारे झेल सोडल्याचे मी क्वचितच पाहिले आहे; पण आजचा दिवस हा त्या दुर्दैवी दिवसांपैकीच एक होता,” असे अश्विनने पुढे म्हटले आहे.
या सामन्यात करुणने निहाल वढेराचा अप्रतिम झेल घेतला होता. तसेच श्रेयसला मिळालेल्या संधींचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. त्याने ३६ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवलेला विजय ठरला आहे.





